Maihar Bus Truck Accident:  Saamtv
देश विदेश

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Gangappa Pujari

Maihar Road Accident: मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने प्रयागराजहून नागपूरला जाणारी बस रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर २१ जण जखमी झालेत. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की जेसीबीच्या कटरने पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही बस प्रयागराजहून नागपूरला जात होती. मैहर जिल्ह्यातील नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला बसने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झालेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मैहर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीने मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या मृतांचे मृतदेह जेसीबी कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भितीही पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी सांगितले आहे.

मैहरचे एसपी सुधीर अग्रवाल यांनी सांगितले की, "ही घटना मैहरपासून 10 किमी अंतरावर असलेल्या रीवा रोड नादान ग्रामीण भागात घडली. बस प्रयागराजहून नागपूरला प्रवाशांसह जात होती. अपघात इतका भीषण होता की, बस ट्रकला धडकली आणि त्यातच अडकली त्यानंतर बस कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एसडीएम विकास सिंह, तहसीलदार जितेंद्र वर्मी यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले. एसपी मैहर सुधीर कुमार अग्रवाल, सीएसपी राजीव पाठक घटनास्थळी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Capital: महाराष्ट्राची राजधानी कोणती? माहितीये का?

Nitin Deshmukh : ठाकरेंच्या आमदार पुत्रावर प्राणघातक हल्ला, सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Beed News : बीडमध्ये भाजप नेत्याचे बंडखोरीचे संकेत; माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा राडा; सूरजमुळे निक्की आणि अंकिता भिडले..

SCROLL FOR NEXT