Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवास्थानी महायुतीच्या नेत्यांची शनिवारी मध्यरात्री महत्वाची बैठक पार पडली.
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?
Maharashtra Political News
Published On

लोकसभेचा गुलाल खाली पडताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा दौरा करून गेलं आहे. त्यामुळे लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते अलर्ट मोडवर आले असून त्यांनी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवास्थानी महायुतीच्या नेत्यांची शनिवारी मध्यरात्री महत्वाची बैठक पार पडली.

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होणार? भाजप आमदारांना धडकी; अनेकांची झोपच उडाली

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची उपस्थिती होती. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बैठकीत महायुतीच्या जाहीरनाम्याची तयारी देखील करण्यात आली आहे. या जाहीरनाम्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्याच्या दिशा देखील ठरवण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षाला कोणत्या जागांवर किती मताधिक्य मिळू शकते, यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. आपली रणनिती अधिक मजबूत कशी करता येईल, यावर देखील तिन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीतील तिन्ही घटकपक्षातील नेत्यांसोबत जागावाटपावरून चर्चा केली होती.

यावेळी भाजप १५० ते १६० जागांवर शिवसेना ८० ते ९० आणि अजित पवार गट ४५ ते ५० जागांवर निवडणूक लढवू शकते, असा फॉर्म्युला समोर आला होता. त्यामुळे हाच फॉर्म्युला कायम राहणार का यामध्ये काही बदल होणार? याकडे देखील सर्वांच्या नजरा लागून आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी नेत्यांनी सुद्धा विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोण गुलाल उधळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?
PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com