Horoscope Today
Horoscope Today in Marathi Saam tv

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope Today in Marathi : आज काही जणांना नको असलेल्या गोष्टींचा त्रास होईल. तर कोणाचे शत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. वाचा तुमचं संपूर्ण राशीभविष्य
Published on

आजचे पंचांग

सोमवार, १८ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष,

संकष्टी चतुर्थी.

तिथी-तृतीया १८|५७

रास- मिथुन

नक्षत्र- मृग

योग-सिद्ध योग

करण-वणिज

दिनविशेष- ८ प.चांगला

मेष - प्रियकराबरोबर विनाकारण द्वंद्व वाढेल अशा गोष्टी टाळा. नको असलेल्या गोष्टींचा त्रास होईल. मानसिकता शांत ठेवली तर लाभ पदरात पडेल. गणेश उपासना करा.

वृषभ - परदेशाचे योग नक्की होतील. आपल्याच लोकांकडून घात झाल्याचे भावना होईल. मनस्ताप वाढेल. खर्चाला स्वतःच आळा घालावा लागेल.

मिथुन- बोलून जग जिंकाल आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक स्वतःला आणि इतरांनाही कळेल. आनंदी दिवस आहे. इच्छा पूर्ण होतील.

Horoscope Today
Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

कर्क - घरामध्ये पाहुण्यांची उठबस होईल. अगत्यात दिवस धावपळीचा राहील. कदाचित आज तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य द्याल आणि आनंदाची झोळी भरून जाईल.

सिंह - छोटे प्रवास घडतील लहान गोष्टींनी मन सुखावून जाईल स्तुतिप्रियतेकडे कल राहील. भावंडांची जबाबदारी उचलाल.

Horoscope Today
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात काचेचे फर्निचर करण्याआधी करा 'या' नियमांचे पालन; अन्यथा....

कन्या - नवीन वस्तूंची खरेदी होईल. शेतीची कामे मागील मार्गी लागतील. ज्येष्ठांचा सल्ला आज उपयोगी पडेल. दिवस संमिश्र असेल.

तूळ- प्रेमामध्ये भरघोस यश मिळेल. संततीकडून चांगल्या वार्ता कानी येतील. क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती होईल. कलाक्षेत्र सुद्धा तेवढेच गाजवाल. संकष्टीनिमित्त विशेष गणेश उपासना करावी.

Horoscope Today
Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे होऊ शकतो डोळ्यांना त्रास; अशा प्रकारे घ्या काळजी

वृश्चिक - शत्रू डोके वर काढतील. नको ते आजार मागे लागतील. पाणी आणि खाणे दोन्ही जपून वापरा अन्यथा तब्येत बिघडेल. दिवस बरा आहे.

धनु - व्यवसायामध्ये नवीन संधी येतील आपल्या भागीदाराचा सल्ला आज ऐकावा लागेल. प्रवास घडतील. देण्याघेण्याचे व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगावी.

मकर - घोडे मेले ओझाने असा आजचा दिवस आहे. त्रास कटकटी संपणार नाहीत. विनाकारण दगदग वाढवून घेऊ नका. अकल्पित पैसा मिळत नाही. इच्छा केल्यास यामध्ये अडकाल.

Horoscope Today
Acharya Chanakya: दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आचार्य चाणाक्यांचे 'हे' नियम पाळा

कुंभ - बुद्धी आणि मन याचे द्वंद्व आहे. पण भाग्य खंबीर साथ देईल. शिव उपासना, गणेश उपासना आज फलदायी ठरणार आहे. मोठे प्रवास घडतील.

मीन - मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचा आजचा दिवस आहे. कामांची धावपळ वाढेल पण त्यातून नवीन वाटा यश प्राप्ती सहज मिळून जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com