Anti Terrorism Torch Rally Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh News: दहशतवादविरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना, ३० जण गंभीर जखमी

Anti Terrorism Torch Rally: शुक्रवारी खंडवा शहरात दहशतवाद विरोधी मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये भडका उडाला आणि ३० जण जखमी झाले.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

मध्यप्रदेशातील खंडवा शहरात शुक्रवारी दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत अचानक मशालींचा भडका उडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत रॅलीत सहभागी झालेले ३० जण होरपळले होते. यामधील १५ जणांची प्रकृती गंभीर असून या सर्वांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने आयोजकांपैकी १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शुक्रवारी खंडवा शहरात दहशतवाद विरोधी मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान अचानक आग लागल्याने रॅलीत सहभागी झालेल्यांपैकी ३० जण होरपळले होते. या घटनेमुळे घटनास्थळावर गोंधळ उडाला होता. जखमी झालेल्या १५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खंडवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन ही रॅली काढण्यात आली होती. जरी प्रशासनाकडून परवानगी घेऊन ही दहशतवाद विरोधी रॅली काढण्यात आली होती तरीही आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT