Madhya Pradesh EVM Bus Fire News Saam TV
देश विदेश

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Madhya Pradesh News: मध्यप्रदेशातील बैतूल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या एका बसला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

Satish Daud

मध्यप्रदेशातील बैतूल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या एका बसला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसला लागलेल्या आगीत ३ ईव्हीएम मशीन जळाल्याची माहिती आहे. याशिवाय बस देखील जळून खाक झाली आहे. इतर माहिती मात्र अद्याप समोर नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीवर नियंत्रण मिळवत बसमधील ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात आल्या आहेत. मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडलं.

यामध्ये मध्य प्रदेशातील मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगढ आणि बैतूल या ९ मतदारसंघाचा देखील समावेश होता. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात 66.12 टक्के मतदान झाले असून कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही.

मात्र, बैतूल येथील ६ मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या एका बसला मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी बसमधून उड्या घेतल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, आगीत तीन ईव्हीएम मशीन जळल्याची प्राथामिक माहिती आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT