EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

Maharashtra Politics: : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कसा होता आजचा संपूर्ण दिवस? मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात कुठं काय घडलं, हे जाणून घेऊ...
Maharashtra Politics:
Maharashtra Politics: Saam Tv

Maharashtra Lok Sabha Election:

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज संपूर्ण दिवस अनेक घडामोडींची भरलेला होता. तिसरा टप्पा हा हाणामारीच्या अनेक घटनांनी गाजला. तर या टप्प्यात एका ठिकाणी चक्क ईव्हीएम जाळल्याची घटनाही घडली. यातच ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी आज रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखलही झाला. कसा होता आजचा संपूर्ण दिवस? मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात कुठं काय घडलं, हे जाणून घेऊ...

अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात आज एकूण 11 जागांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांमध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शरद पवार, अजित पवार, ओमराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भाेसले यांचा समावेश आहे.

Maharashtra Politics:
Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप

आज मतदानाला एकीकडे सुरुवात झाली असताना सकाळी एका ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे ट्वीट केलं होतं शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी. रोहित पवार यांनी एक ट्वीट करत अजित पवार गटावर मध्यरात्री बारामतीतील मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटले, असा गंभीर आरोप केला. यासोबत त्यांनी काही व्हिडीओही पोस्ट केले. ज्यावरून आज दिवसभर दोन्ही गटाकडून एकमेंकानावर आरोपांच्या फैरी सुरु होत्या.

तिसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी हाणामारी

राजकीय नेते आज एकीकडे आरोप-प्रत्यारोप करत असताना कार्यकर्ते थेट हाणामारीवर उतरले होते. राज्यात आज अनेक ठिकाणी मतदानादरम्यान राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये धाराशिव, हातकणंगलेत येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात राडा झाला.

Maharashtra Politics:
Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

मतदान यंत्रात बिघाड

सांगली सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पलूस कडेगांव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक 250 मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. मतदान यंत्र बंद पडले. तर रायगड जिल्ह्यातील धाटाव येथील मतदान केंद्रातील मशिनमध्येही बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com