Lizard found In beer bottle Saam Tv
देश विदेश

VIDEO: अरे बापरे! बियरच्या बाटलीत आढळली मृत पाल ; संतापजनक प्रकार

Dead Lizard found In beer bottle video viral: बियरच्या बाटलीत पाल सापडल्याची घटना घडली. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई: आपण आतापर्यंत समोसा, भेळ यामध्ये झुरळ, पाल आढळल्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण आता बियरच्या बॉटलमध्ये पाल निघाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील आहे. तिथे एका व्यक्तीच्या बियरच्या बाटलीत मृत पाल आढळून आलीय. ही बिअर विकत घेतलेल्या व्यक्तीने आरोप केलाय की, जेव्हा तो दुकानदाराकडे तक्रार करायला गेला, तेव्हा त्याच्याशी गैरवर्तन केलं गेलं. दुकानदाराने शिवीगाळ करत त्याला दुकानाबाहेर हाकललं.

नक्की काय घडलं?

मध्यप्रदेशमध्ये सचिन नावच्या एका व्यक्तीने दुकानातून बियरची बाटली विकत घेतली. परंतु घरी गेल्यानंतर त्याने बाटली उघडली आणि त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. त्याला बाटलीमध्ये एक मृत पाल (Madhya Pradesh News) आढळली. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ दुकानात धाव घेतली, दुकानदाराकडे तक्रार केली. परंतु दुकानदाराने सचिनला थेट हाकलून लावलं. त्याने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ बनवला होता, तो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

बियरच्या बाटलीत पाल आढळली

मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल जिल्ह्यातील सचिन नावाच्या व्यक्तीने दुकानातून बिअरची बाटली विकत घेतली होती. घरी आल्यानंतर त्याने बाटलीतून बियर ग्लासात ओतली. तेवढ्यात एक विचित्र वस्तू देखील बाटलीमधून बाहेर आली आणि ग्लासात (Dead Lizard found In beer bottle) पडली. सचिनला ती मृत पाल असल्याची खात्री पटली. घडलेल्या प्रकारानंतर सचिन संतापला होता. त्याने बियर शॉपीमध्ये जावून गोंधळ घातला.

मध्यप्रदेशमधील धक्कादायक प्रकार

मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिअरची बाटली सीलबंद असल्याचं सचिनने सांगितलं (Lizard found In beer) आहे. बाटली पूर्णपणे बंद होती तर पाल आतमध्ये कशी पोहोचला, हा प्रश्न आता निर्माण होतोय. जेव्हा सचिन या घटनेबद्दल तक्रार करायला गेला, तेव्हा दुकानदाराने त्याला शिवीगाळ करून हाकलून (Viral Video) दिलं. यावर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही व्हिडिओ पाहिला आहे. बाटलीच्या आत पाल कशी गेली, याचा तपास करत आहोत. संबंधित लोकांवर नक्कीच कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी दिल्याची माहिती टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT