Nanded Food Poisoning: चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; शाळेत मिळणाऱ्या खिचडीत आढळली शिजलेली पाल, २१ विद्यार्थ्यांना विषबाधा

Nanded Poshan Aahar News: शाळेतील 122 विद्यार्थ्यानं पैकी 21 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कापसी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Nanded Food Poisoning
Nanded Food PoisoningSaam TV
Published On

संजय सूर्यवंशी

Nanded News: पोषण आहाराच्या खिचडीत चक्क पाल शिजल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. शाळेतील 122 विद्यार्थ्यानं पैकी 21 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कापसी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीय. (Latest Poshan Aahar Yojana News)

नुकत्याच सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत आहेत. परंतु हेच पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडीत चक्क शिजलेली पाल आढळली. ही खिचडी शाळेतील विद्यार्थ्यांनी खाल्याने विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.

Nanded Food Poisoning
Pune Crime News: थेट कॉलेजमध्ये कोयता काढून माजवली दहशत; पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढून तरुणाचा उतरवला माज

122 विद्यार्थ्यानं पैकी 21 विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे दाखल करण्यात आले. नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहारातील खिचडी वाटप करण्यात आली.काही विद्यार्थ्यांनी ही खिचडी शाळेतच खाल्ली. तर काही जणांनी घरी जाऊन ही खिचडी खाल्ली. त्यातील पहिलीत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी आरुषी बेटकर हिला तिच्या खिचडीत मृत पाल आढळून आली. तिने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

वडिलांनी ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकाला दिली. काही वेळात शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. 122 विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाली होती. खिचडी खाल्याने यातील 21 विद्यार्थ्यांना मळमळ,उलट्या चक्कर येण्यास सुरुवात झाली. तातडीने या विद्यार्थ्यांना जवळच्या कापसी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर आरोग्य विभागाचे एक पथक वाळकी येथील शाळेत दाखल झाले असून शाळेत विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत.

Nanded Food Poisoning
UP Crime News: बापरे! आंघोळीवरुन झाला वाद अन् घडलं भयंकर; लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

आता या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे.चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने (Education Department) सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com