Madhya Pradesh Girl Fell Into Borewell
Madhya Pradesh Girl Fell Into Borewell Saam Tv News
देश विदेश

Madhya Pradesh News: 300 फूट खोल बोअरवेलमध्ये चिमुकलीचा अडकला श्वास, NDRF चा 48 तासांपासून संघर्ष; नळ्यांमधून ऑक्सिजन, रोबोटही मागवले

Priya More

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) तीन वर्षांची चिमुकली 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना (Girl Fell Into Borewell) समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. या चिमुकलीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. गेल्या 48 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन (rescue operation) सुरु आहे. गुरुवारी सकाळी या चिमुकलीला वाचवण्यासाठी रोबोटिक एक्सपर्टला बोलावण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती जेव्हा बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती २० फूटावर अडकली होती. पण आता ती १०० फूटांपर्यंत खाली गेली आहे त्यामुळे तिला वाचवण्यासाठी अडचणी येत आहेत. सृष्टीला पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजन दिला जात आहे. सृष्टीला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम, भारतीय लष्कराचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमकडून प्रयत्न सुरु आहेत.

बुधवारी लष्कराच्या जवानांनी बोअरवेलमध्ये रॉड टाकून सृष्टीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सृष्टीला १० फुटांपर्यंत वर काढण्यात आले होते. पण आता तिचे कपडे फाटल्यामुळे ती आणखी खाली गेली आहे. सृष्टी ज्याठिकाणी बोअरवेलमध्ये पडली आहे तो परिसर खडकाळ आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करताना अडचणी येत आहेत.

सृष्टीला लवकर बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी रोबोटिक टीमला दिल्लीवरुन बोलावण्यात आले आहे. सृष्टीला आता रोबोटच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बोअरवलेच्या समांतर खोदकाम देखील केले जात आहे. यामुळे सृष्टीजवळ पोहचणे शक्य होईल. सृष्टीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वस्तरावरुन प्रार्थना केली जात आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, सृष्टी सुरुवातीला बोअरवेलमध्ये २० फूटांवर अडकली होती. पण बचावकार्यासाठी मशीनद्वारे करण्यात आलेल्या खोदकामामुळे बसलेल्या हादऱ्यामुळे सृष्टी आणखी खाली गेली. ती सध्या १०० फूटांवर अडकली आहे. त्यामुळे तिला बाहेर काढणे आणखी कठीण झाले आहे. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची टीम बचावकार्यावर नजर ठेवून आहेत. ते जिल्हाअधिकाऱ्यांच्या देखील संपर्कात आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये १२ वर्षांचा मुलगा पुलाच्या पिलरमध्ये अडकला आहे. दोन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. त्याला शोधत असताना तो रोहतासच्या सोन नदीच्या पुलामध्ये अडकल्याचे दिसून आले. स्थानिक प्रशासनाकडून या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. हा मुलगा सुखरुप वाचावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. घटनास्थळावर मोठ्यासंख्येने गावकरी उपस्थित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानच्या पराभवाचा चौकार! ५ विकेटने पंजाब किंग्सचा विजय

Slovakia PM: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?

SCROLL FOR NEXT