Gondia Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, मुलाने जन्मदात्या आईलाच संपवलं; खळबळजनक घटना

Gondiya Crime News: गोंदिया शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे.
Gondia Crime News Son Killed Mother
Gondia Crime News Son Killed MotherSaam TV

शुभम देशमुख, साम टीव्ही

Gondia Crime News: गोंदिया शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. शहरातील श्रीनगर परिसरात बुधवारी (७ जून) एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना होता. तपासाची चक्रे फिरवत २४ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. (Latest Marathi News)

चारित्र्याचा संशय घेऊन मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याचं उघड झालं आहे. संध्या कोरे (वय ४८) असं मृत महिलेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी करण कोरे (वय २४) याला ताब्यात घेतलं आहे. मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Gondia Crime News Son Killed Mother
Pune Crime News: पुण्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेलं, सैफवर गुन्हा दाखल

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृतक संध्या कोरे मुलगा करण कोरे याच्यासोबत गोंदिया शहरातील श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. संध्या यांच्या पतीचे २० वर्षापूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या माहेरी येऊन किरायाच्या खोलीत राहत होत्या.

संध्या यांचा मुलगा करण कोरे हा नागपूरला एमआरशिप करीत होता. तो अधून मधून गोंदियाला (Gondia News) यायचा. परंतु जानेवारी २०२३ पासून तो गोंदियात आईसोबत राहत होता.आपल्या आईच्या चारित्र्यावर करण याला संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते.

Gondia Crime News Son Killed Mother
Sillod Crime News: मामाने मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने केलं भयानक कांड; सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की करण याने आईला मारहाण (Crime News) करणे सुरू केले. दरम्यान आईने स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा चावा घेतला. मात्र, करणने बेदम मारहाण करत आईची हत्या केली.

हत्येनंतर करणने बनाव रचला. त्याने सुरूवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचा बनाव उघड झाला. चारित्र्याच्या संशयातून आपणच आईची हत्या केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी करणला ताब्यात घेतलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com