Sillod Crime News: मामाने मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने केलं भयानक कांड; सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: मामाने लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने केलं भयानक कांड, सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime NewsSaam TV
Published On

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: मामाच्या मुलीवर जीव जडल्यानंतर तरुणाने लग्‍नाची मागणी घातली. मात्र, मुलीला आणखी शिकवायचे आहे, त्यामुळे लग्नाचं नंतर बघू, असं म्हणत मामाने नकार दिला. त्यामुळे तरुणाला राग अनावर झाला. या रागातून त्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरूवात केली. (Latest Marathi News)

ही बाब लक्षात आल्यानंतर मामाने भाच्याला समज दिली. मात्र, तरीही त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. अखेर मामाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विकृत भाचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
Bihar Crime News: संतापजनक! लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, २४ वर्षीय तरुणाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मामा आणि भाचा दोघेही सिल्लोड (Chhatrapati Sambhaji Nagar) तालुक्‍यातील एकाच गावात राहतात. नेहमी घरी येणे जाणे असल्याने भाच्याचा मामाच्या मुलीवर जीव जडला. तो तिच्या इतक्‍या प्रेमात होता, की त्‍याने स्वतःच मामाकडे मुलगी मागितली.

मात्र मुलीला शिकवून स्वतःच्या पायावर उभी करायची आणि मगच तिच्या लग्‍नाचा विचार करायचा, असा विचार मामाच्या मनात होता. त्‍यामुळे मामाने भाचाला नकार दिला. वारंवार मागणी घालूनही मामाने नकार दिल्याने भाच्याला (Crime News) राग अनावर झाला. त्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News
Pune Crime News: दबक्या पावलांनी पतीजवळ आली अन् थेट गळाच कापला; गहुंजे हत्या प्रकरणाचा २४ तासांत उलगडा

हा प्रकार लक्षात येताच मामाने त्‍याला समजावून सांगितले आणि फोटो डिलिट करण्यास सांगितले. यानंतर असे काही करायचे नाही, अशी समजही त्यांनी भाच्याला दिली. मात्र यामुळे भाचा आणखीनच चिडला. त्‍याची विकृती वाढून तो मामाच्या मुलीची छायाचित्रे एडिट करून आक्षेपार्ह पद्धतीने व्हिडिओ तयार करून व्हॉट्‌स ॲपला ठेवू लागला. सोशल मीडियावर टाकू लागला होता.

१९ मे ते २ जूनदरम्यान भाचाने हा प्रताप केला. याप्रकरणी मामाने पोलीस अधीक्षक (Police) कार्यालयातील ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून लगेचच संशयित भाचाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com