bjp minister controversy News Saam tv
देश विदेश

bjp minister controversy : भाजप सरकारचा बडा नेता गोत्यात; कर्नल सोफिया कुरैशींवरील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल

bjp minister cpo controversial statement : भाजप सरकारचा बडा नेता गोत्यात सापडलाय. भाजप नेत्याने कर्नल सोफिया कुरैशींवरील वक्तव्य भोवलं आहे.

Vishal Gangurde

Vijay Shah News : कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते, मंत्री विजय शहा अडचणीत सापडले आहेत. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात हायकोर्टाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हायकोर्टाने मध्य प्रदेशच्या महासंचलाकाला मंत्री विजय शहा यांच्याविरोधात ४ तासांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सकाळी होणार आहे.

हायकोर्टाचे न्यायाधीश अतुल श्रीधरण आणि अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं. त्यानंतर मध्य प्रदेशच्या महासंचालकांना मंत्री विजय शहा यांचया विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने मंत्री विजय शहा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनाही कारवाईचे कडक निर्देश दिले होते.

कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशच्या काँग्रेसने भाजप मंत्री विजय शहा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईसाठी आंदोलन केलं होतं. काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी बुधवारी भोपाळच्या श्यामला हिल्स ठाण्यात पोहोचले होते. त्यांनी एडीसीपी शालिनी दीक्षित यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पोलिसांनी जीतू पटवारी यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे.

मध्य प्रदेशमधील भाजप सरकामधील कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी एका सभेत कर्नल सोफिया कुरैशींवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विजय शहा यांनी कर्नल सोफिया यांचं नाव न घेता पाकिस्तानी दहशतवाद्यांबाबत वक्तव्य केलं होतं. 'आम्ही त्यांची बहीण पाठवून त्यांच्यावर कारवाई केली, असं वक्तव्य मंत्री विजय शहा यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर विजय शहा यांच्या अडचणीत भर पडली आहे. विजय शहा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका; कुर्ला रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत|VIDEO

Maharashtra Live News Update: - ठाणे महापालिका क्षेत्रातील १५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळा विसराल; सांगलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक शांत अन् सुंदर हिल स्टेशन

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

Hukumachi Rani Hee: अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ; 'हुकुमाची राणी ही' मालिकेत लवकरच येणार मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT