
टाटा आयएपीएल २०२५ चे सामने पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने १७ मे २०२५ ते ३ जूनपर्यंत खेळवण्यात येणार आहे. उर्वरित सामने हे एकूण ६ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. टाटा आयपीएलचे आता एकूण १७ सामने खेळवण्यात येणार आहे.
नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात दोन डबर हेडरचाही समावेश आहे. दोन्ही डबर हेडर हे दोन रविवारी खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर आयपीएलचे सामने थांबवण्यात आले होते. आता उर्वरित सामने खेळवण्यात येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
बीसीसीआयने सरकार आणि सुरक्षा एजन्सीशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. सर्व प्रमुखांशी चर्चा करून या हंगामाचे उर्वरित सामने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आयपीएलचे उर्वरित १७ सामने ६ वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत.
या हंगामाचा अंतिम सामना ३ जून २०२५ रोजी खेळवण्यात येणार आहे. डबर हेडर सामने फक्त रविवारी खेळवण्यात येणार आहेत. प्लेऑफचेही सामने जाहीर करण्यात आले आहेत. प्लेऑफमध्ये टॉप ४ संघ खेळताना दिसतात.
क्वालिफायर १ - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५
क्वालिफायर २ - १ जून २०२५
फायनल - ३ जून २०२५
या चार सामन्यांचे ठिकाण बीसीसीआयकडून नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. चारही सामन्यांचं आयोजन प्रमुख शहरात किंवा सुरक्षित मैदानात होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.