Liquor Ban  saam tv
देश विदेश

Liquor Ban : ऐतिहासिक मंदिरांच्या १७ शहरांमध्ये दारुबंदी; सरकारचा मोठा निर्णय, वाचा

Liquor Ban in Madhya Pradesh News : ऐतिहासिक मंदिरांच्या १७ शहरांमध्ये दारुबंदी करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आल आहे.

Vishal Gangurde

Liquor Ban In Madhya Pradesh: मध्य प्रदेश सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने धार्मिक आणि पवित्र शहरांमध्ये दारुबंदीची घोषणा केली आहे. महेश्वरच्या कॅबिनेट बैठकीत १७ शहरात दारुबंदी निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घेतलेल्या निर्णयाची देशभर चर्चा सुरु झाली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने १७ शहरात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शहरांमध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, मैहर, खजुराहो, महेश्वर, ओरच्छा, सांची, नलखेडा, सलकनपूर, जबलपूर, मंदसौरा या जिल्ह्यांच्या नावाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नर्मदा नदी पात्रातील ५ किलोमीटरच्या हद्दीत दारूबंदीचा निर्णय कायम राहणार आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कॅबिनेट बैठकीत सहभाग नोंदवण्याआधी याविषयी घोषणा केली होती. या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते.

कोणत्या १७ शहरात दारुबंदी?

नगरपालिका

दतिया (माँ पीतांबरा पीठ)

पन्ना (जुगल किशोर मंदिर)

मंडला (नर्मदा नदीचं पात्र)

मूलताई (ताप्ती नदीचं उगम स्थान)

मंदसौर (पशपतिनाथ मंदिर)

मैहर (माँ शारदा मंदिर)

नगर परिषद

ओंकारेश्वर (ज्योतिर्लिंग)

महेश्वर (नर्मदा नदीचं पात्र, प्रसिद्ध मंदिर)

मंडलेश्वर (नर्मदा नदीचं पात्र)

चित्रकूट (राम घाट )

अमरकंटक (नर्मादा नदीचं उगमस्थान)

ओरछा (रामराजा सरकार मंदिर)

ग्राम पंचायत

सकलनपूर (बिजयासन माता मंदिर)

बरमान कला (नर्मदा नदी पात्र)

लिंगा (प्रसिद्ध जैन मंदिर)

बरमान खुर्द (नर्मदा नदी पात्र)

कुंडलपूर (प्रसिद्ध जैन मंदिर)

बांदकपूर (देवश्री जागेश्वर नाथ मंदिर)

दारुबंदीवर मुख्यमंत्री मोहन यादव काय म्हणाले?

मध्य प्रदेश सरकारने १७ धार्मिक शहरात दारुबंदीचा निर्णय घेतला आहे, त्यावर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, 'मी जनतेच्या बाजून निर्णय घेतला. आम्ही आनंद होत आहे की, आम्ही हा निर्णय घेत आहे. आम्ही दूरदृष्टीकोनातून जनतेला लाभ मिळणार आहे. दारुमुळे होणारे नुकसान सर्वांना माहीत आहे. शहरात दूध, घी या सारखे दुकान सुरु व्हावे, याचा मानस आहे. दारुबंदीच्या निर्णयाने राज्याच्या महसूलावरही मोठा फरक पडणार नाही. आमचं सरकार सक्षम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT