Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं- चांदी वितळवण्यास नकार, हायकोर्टाने परवानगी अर्ज फेटाळला

High Court On Tulja Bhavani Gold And Silver Offering: तुळजाभवानी देवीच्या चरणी १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या कालावधी दरम्यान जमा झालेल्या सोनं-चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती. पण आता उच्च न्यायालयाने ही परवानगी नाकारली आहे.
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं- चांदी  वितळवण्यास नकार, हायकोर्टाने परवानगी अर्ज फेटाळला
Tuljabhavani MandirSaam TV
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव

महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं आणि चांदीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं- चांदी वितळविण्याच्या परवानगीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. वकील उमेश भडगावकर यांनी ही माहिती दिली.

तुळजाभवानी देवीच्या चरणी १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या कालावधी दरम्यान जमा झालेल्या सोनं-चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती. मंदीर संस्थानच्या वतीने तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं- चांदी वितळविण्याबाबत परवानगी अर्ज करण्यात आला होता. पण आता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. तुळजाभवानी देवीच्या चरणी १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या कालावधीमध्ये भक्तांनी तब्बल २०७ किलो सोनं आणि २ हजार ५७० किलो चांदी अर्पण केली आहे.

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं- चांदी  वितळवण्यास नकार, हायकोर्टाने परवानगी अर्ज फेटाळला
Dharashiv case: सफाई कर्मचारी महिलेकडं शरीरसुखाची मागणी, लिपिकावर आरोप; कळंब पालिकेतील धक्कादायक प्रकारानं खळबळ

विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदिर संस्थानला सोनं आणि चांदी वितळविण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र याला हिंदू जनजागरण समीतीने विरोध केला होता. त्यामुळे हिंदू जनजागरण समीतीने उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. मंदिर संस्थानने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जावे अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं- चांदी  वितळवण्यास नकार, हायकोर्टाने परवानगी अर्ज फेटाळला
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान रखडले; १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तुळजाभवानी देवीचे सोनं- चांदी वितळवण्यास विरोध करत तक्रार दाखल केली होती. त्याचसोबत त्यांनी आंदोलनही केले आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जवळपास १३ वर्षांनंतर तुळजाभवानी देवीच्या सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्याची प्रक्रिया राबवली जाणार होती पण त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं- चांदी  वितळवण्यास नकार, हायकोर्टाने परवानगी अर्ज फेटाळला
Dharashiv Crime: कोरियन सिंगर ग्रुपच्या भेटीसाठी ३ मुलींची भलतीच करामत; रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com