Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान रखडले; १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या दोन लाख ५९ हजार ८८७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २२१ कोटी ८१ लाख नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र अजूनपर्यंत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही. धाराशिव जिल्ह्यातील साधारण १ लाख ८० हजार शेतकरी केवायसी पुर्ण करुनही अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हि रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. 

गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील पिकांचे ३३ टक्यापेक्षा अधिक नुकसान झाले. नियमानुसार जिल्हा प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ८० हजार ७८६ बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख ५९ हजार ८८७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २२१ कोटी ८१ लाख नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यामध्ये धाराशिव, कळंब, वाशी व परंडा ता चार तालुक्याचा समावेश होता. 

Dharashiv News
AI Technology : एआय तंत्रज्ञानामार्फत होणार पंढरपूर यात्रेतील गर्दीचे मॅनेजमेंट; संगणक प्रणालीसाठी दोन कोटींचा प्रस्ताव

८६ कोटींचा प्रस्ताव अडकला 

राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रीया पुर्ण केली. ही प्रक्रीया पुर्ण होवुन तीन आठवडे झाले तरीही शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अनुदान लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे. तर लोहारा व उमरगा तालुक्यातील ८६ कोटी ५२ लाख रुपयांच्या अतिवृष्टीच्या प्रस्तावाची मान्यता मंञालयात अडकली आहे.

Dharashiv News
Fraud : ३५ कोटी घेत क्विक स्टार्ट कंपनीच्या कार्यालयाला कुलूप; आमिषाने दीड हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

बुलढाणा जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित
बुलढाणा
: रब्बी हंगाम संपत आला आहे. तरी केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप केवळ ४ हजार ७३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याने जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकावर फौजदारी दाखल करा. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल रिंढे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com