Dharashiv Crime: कोरियन सिंगर ग्रुपच्या भेटीसाठी ३ मुलींची भलतीच करामत; रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

Fake kidnapping case: धाराशिवच्या मुलींना कोरियन सिंगर ग्रुपच्या भेटीची ओढीतून तीन मुलींनी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला.
Dharashiv Crime
Fake kidnapping case Dharashiv Saam Tv
Published On

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

सेलिब्रेटिला भेटण्यासाठी त्यांचे चाहते काहीही करण्यास तयार असतात. कोणी आपल्या आवडत्या हिरो हिरोईनच्या घराबाहेर तासन् तास उभे राहतात. तर काहीजण हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्या हिरोला भेटतात. पण यात काहीजण चुकीचा मार्ग पत्कारतात आणि सेलिब्रेटिंना भेटतात. असाच प्रकार धाराशिवमधील तीन मुलींनी केलाय. आपल्या आवडत्या सेलिब्रेटिंना भेटण्यासाठी या मुलींनी आपल्याचा अपहरणाचा कट रचला. ही घटना घडलीय उमरगा तालुक्यातील निलूनगर तांड्यात.

येथील तीन मुलांनी स्वत:च्याच अपहरणाचा कट रचला. मात्र सतर्क पोलिसांनी या मुलींचा कट हाणून पाडलाय. पोलिसांनी अपहरणाचा कट ऑपरेनश मुस्कान अंतर्गत हाणून पाडला. समाज माध्यमातून कोणाच्या मनावर काय परिणाम होईल सांगता येत नाही. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तांड्यावर राहणाऱ्या शाळकरी मुलींना सोशल मीडियावरील रिल्स अन् युट्यूब वरील व्हिडिओ पाहून BTS V या कोरियन सिंगर ग्रुपची आवड निर्माण झाली.

काय आहे प्रकार

उमरगा तालुक्यातील निलूगर तांड्यावरील तीन मुली कोरियन सिंगर ग्रुपच्या जबरा चाहत्या. मग या सिंगर भेटण्याचं त्यांनी कोरियाला जाण्याचा प्लान आखला. यासाठी कुटुंबियविरोध करतील म्हणून त्यांनी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. तुरोरी येथे या मुली शिक्षण घेत होत्या. शाळा सुटल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बसमधून काही लोकांनी या मुलीचे अपहरण केल्याचा कॉल उमरगा पोलिसांना आला.

Dharashiv Crime
Sunil Pal Kidnapping : कॉमेडियन सुनील पालच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड अर्जुन कर्नावालचा बदलापूर पॅटर्नने एन्काउंटर

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत अवघ्या तीस मिनिटात याचा छडा लावला. घरातील ५ हजार रुपये घेऊन या मुली पुण्याकडे निघाल्या होत्या. पुण्यात जाऊन पैसे कमवू आणि थेट कोरियाला जाऊ असं त्यांचं नियोजन होतं. मात्र पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून मुलींचे लोकेशन मिळवून मोहोळ येथे मुलींना गाठत संपूर्ण प्रकार उघड केला. आता या मुलींना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पोलीस सर्व अंगाने तपास करत आहेत.

Dharashiv Crime
Nanded News: मोठी बातमी! नांदेडच्या ठाकरे गट सेनेच्या शहर प्रमुखाचं अपहरण

पोलिसांनी सांगितली अपहरणाची कहाणी

या मुली बीएटएस सिंगर ग्रुपच्या चाहत्या आहेत. त्यांना भेटण्यासाठी या मुलींनी अपहरणाचा बनाव रचला होता. कोरियाला जाण्यासाठी पैसा पाहिजे म्हणून त्या पुण्याला जात होत्या. तेथे पैसे कमावून त्या पैशांच्या मदतीने त्या कोरियाला जाणार होत्या. अशी माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

Dharashiv Crime
Kalyan Case : कल्याणच्या नराधमाला बायकोची साथ; विशाल गवळीच्या शेगावातून मुसक्या आवळल्या, अटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद,VIDEO

येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी स्वत: च्या अपहरणाचा बनाव रचला होता. या तीन मुलींचं अपहरण झाल्याचा कॉल पोलिसांना आला होता. एका पिवळ्या रंगाच्या बसमधून या तिन्ही मुलींचं अपहरण झालं आहे. कोणतरी चाकूचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आलं असा कॉल पोलिसांना आला. परंतु या मुली दोन वाजेच्या बसने उमरगाहुन पुण्याला जात होत्या.

उमरगा ते पुणे या बसमधून त्या प्रवास करत होत्या. त्यावेळी या तिन्ही मुलींपैकी एका मुलीने दुसऱ्या एका प्रवाशाकडून मोबाईल घेतला आणि पालकांशी संपर्क साधला. त्यांनी पालकांना सांगितलं की, चाकूचा धाक दाखवत आमचं अपहरण केलंय. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या तेव्हा या मुली हुबळी तालुकाला जात असल्याचं समोर आलं.

तेव्हा पोलिसांनी हुबळी येथील आदम भाभी नावाच्या महिलेशी संपर्क केला आणि त्यांना या प्रकरणात मदत करण्यास विनंती केली. त्यांनी बसवर लक्ष ठेवलं आणि त्या मुली तेथे उतरल्याचं त्यांनी सांगितलं. त्या मुली पंढरपूर रोडकडे जात असल्याचं आदम भाभी यांनी सांगितलं. त्यानंतर मोहळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिन्ही मुलांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर धारशिवमधील पोलिसांची एक टीम तेथे गेली, आणि त्यांना परत आणलं असं पोलीस अधीक्षक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com