BJP councillor wife murder case Mandsaur latest update 
देश विदेश

Crime : धक्कादायक! भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या बायकोची हत्या, चाकूने सपासप वार

BJP councillor wife murder case Mandsaur latest update : मध्य प्रदेशातील मंदसौर येथे भाजप नगरसेवकाच्या पत्नीची चाकूने हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सावत्र मुलावर संशय घेत तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Step son accused in councillor wife killing Madhya Pradesh case details : मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या २ आरोपींनी चाकूने सपासप वार करत जीव घेतला. मृत महिलेचे नाव रूबीना असे आहे. या धक्कादायक घटनेनंतर मंदसौरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला अन् मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. रूबीना यांचं भाजप नगरसेवकासोबत चौथं लग्न होतं. पोलिसांनी रूबीनाच्या हत्ये प्रकरणी गु्न्हा दाखल केला आहे. सावत्र मुलावर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भाजप नगरसेवकाची तिसरी पत्नी

रुबीना या भाजप नगरसेवक शाहीद मेम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्या माहेरवरून सासरला ऑटोने निघाल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी रूबीनाला ऑटोमधून धक्का देऊन खाली पाडले, त्यानंतर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात रूबीना गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यूझाला होता. मंदसौरमधील अभिनंदन कॉलनीत ही घटना घडली.

७ महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न

शाहिद मेव हे मंदसौर नगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक १५ मधून भाजपचे नगरसेवक आहेत. ७ महिन्यापूर्वी शाहिद मेव यांचं आणि रूबीना यांचं लग्न झाले होते. शाहिद मेव यांचे हे तिसरे तर रूबीनाचे चौथे लग्न होते. गुरूवारी सायंकाळी मदारपुरावरून रूबीना अभिनंदन कॉलनीकडे निघाल्या होत्या. पण घराजवळ पोहचण्याआधी १०० मीटरवर दोन आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारआधीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बाप अन् मुलाचा वाद -

रूबीनाच्या हत्येनंतर पती शाहिद मेव यांनी कुणावर शंका उपस्थित करण्यास नकार दिला. पण शाहिद मेव यांची पहिल्या पत्नीचा मुलगा साहिल याच्यावर सावत्र आईच्या हत्येचा संशय आहे. साहिल सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. रूबीना हिला दोन मुले आहेत.

पोलिसांनी शाहिद मेव याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा साहिल याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केलाय. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय. साहिल हा बापाच्या तिसऱ्या लग्नामुळे नाराज होता. त्यावरून बाप अन् मुलामध्ये अनेकदा वाद झाला होता. दुसरीकडे भाजप नगरसेवकावर सट्टा खेळण्याचाही आरोप आहे. गेल्याच आठवड्यात त्याला सट्टा खेळताना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

Carrot Juice For Glowing Skin: चेहरा दिवस- रात्र चमकेल, रोज प्या गाजराचा हा ज्यूस

Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

Gold Price: इराण युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीला चकाकी, २४ तासांत सोनं ११००० तर चांदी २५००० रुपयांनी वाढले

Central Bank Recruitment: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २७५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT