Gold Rate : सोनं २२ टक्क्यांनी स्वस्त, तर चांदीची किंमत चक्क अर्ध्यावर; ८ दिवसात मार्केट का गडगडले?

Gold price prediction 2026 : सोनं आणि चांदीच्या दरात ८ दिवसांत मोठी घसरण का झाली? डॉलर मजबूत होणे, बजेटपूर्व बाजारातील अस्थिरता आणि एमसीएक्स बदलांचा परिणाम जाणून घ्या. गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ आहे का, याचे सविस्तर विश्लेषण वाचा.
Gold- Silver Price Today
Gold- Silver Price TodaySaam tv
Published On

Gold Silver Price update : सोनं, चांदीच्या किंमतीत किती घसरण होईल? सोनं,चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? घरातील सोनं-चांदी कधी विकणं योग्य? तांबे खरेदी करावे का? आजकाल प्रत्येकजण असे प्रश्न मित्र अथवा जोडीदाराला विचारतोच. सोनं अन् चांदीच्या दरासाठी सराफा दुकानदारांना फोन येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनं अन् चांदीच्या दरात चढउतार होत असल्याचे निदर्शनास आलेय. मागील वर्षभरात सोनं अन् चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. २०२५ मध्ये सोन्याच्या किंमतीत ७० टक्के, तर चांदीच्या किंमतीत १७० टक्के आणि तांब्याच्या किमतीत ५० टक्क्यांची रिटर्न्स दिलेय. २०२६ च्या सुरूवातीलाही सोनं, चांदी अन् तांब्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच धातुंच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. एमसीएक्सवर मागील ८ दिवसात चांदीची किंमत अर्ध्यावर आली आहे, तर सोनं तब्बल २२ टक्क्यांनी घसरलेय. तांब्याच्या किंमतीत १६ टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली.

अचानक किंमतीत मोठी वाढ-

२९ जानेवारी २०२६ रोजी सोनं, चांदी अन् तांब्याच्या किंमती सर्वोच्च पातळीवर होत्या. एमसीएक्सवर सोनं प्रति तोळा १.९ लाखांवर होते, तर चांदी प्रति किलो ४.२० लाखांवर होती. तांब्याची किंमत प्रति किलो १४८० रूपये इतकी होती. मागील वर्षभरात सोनं, चांदी अन् तांब्याच्या किंमतीत ऐतिहासिक वाढ झाली. धातूच्या वाढत्या किंमतीनंतर गुंतवणूकदारांनी यात आणखी पैसे गुंतवण्यास सुरूवात केली. मागील दोन वर्षात सोनं अन् चांदीच्या किंमतीने मोठी उसळी घेतली. चांदीला २ लाखांवरून ३ लाखांवर पोहचण्यासाठी फक्त एक महिना लागला अन् ३ लाखांवरून ४ लाखांवर पोहचण्यासाठी फक्त १० दिवस लागले होते. यावरून चांदीमध्ये लोकांचा रस वाढल्याचा अंदाज येतो.

Gold- Silver Price Today
मध्यरात्री मोठी घडामोड, १२ वाजता खासदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कारवाई

३ दिवसांत किंमती धडाम....

सोनं, चांदी अन् तांब्याच्या वाढत्या किंमतीनंतर गुंतवणूक करणार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. २९ जानेवारीपर्यंत किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. पण त्यानंतर ३ दिवसात सोनं, चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. अचानक दर कोसळायला सुरूवात झाली. ३० जानेवारीपासून धातूंच्या किंमती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या अन् गुंतवणूकदार टेन्शनमध्ये आले. सोनं, चांदी अन् तांब्याच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर काही गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. २ तारखेला पुन्हा दागिन्याच्या किंमतीत वाढ झाली. अनेकांना वाटले की किंमतीत आता पुन्हा एकदा उसळी येणार पण दोन दिवसांतच दर अचानक आणखी कोसळले. आज पुन्हा एकदा दरात वाढ नोंदवण्यात आली.

Gold- Silver Price Today
ZP Election : पुण्यात मतदानाआधीच राडा, अजित पवारांच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शेकडो लोक रस्त्यावर

८ दिवसांत मोठा बदल -

८ दिवसांत सोनं, चांदी अन् तांब्याच्या किंमतीत मोठा बदल झाला. २९ जानेवारीपासून दराच्या बदलाची सुरूवात झाली होती. २९ जानेवारी रोजी सोनं, चांदीच्या किंमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचल्या होत्या. पण पुढील ३ दिवसांत किंमती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. सोन्याची किंमत १.४० लाखांच्या खाली आली. तर चांदीची किंमतही प्रति किलो २.२५ लाखांवर आली. तांब्याची किंमतही प्रति किलो १२४२ वर आपटली. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत १.५५ लाख रूपये प्रति तोळा, तर चांदीची किंमत प्रति किलो २.४९ लाख इतकी झाली. तर तांब्याची किंमत १२१३ रूपयांवर घसरली. ८ दिवसात सोन्याची किंमत २३ टक्क्यांनी घसरली तर चांदीची किंमत तब्बल ४६ टक्क्यांनी कमी झाली. तांब्याची किंमत १८ टक्क्यांनी घसरल्याची नोंद झाली.

Gold- Silver Price Today
ZP Election : पुण्यात मतदानाआधीच राडा, अजित पवारांच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शेकडो लोक रस्त्यावर

सोनं-चांदीच्या किंमतीत इतकी घसरण का होतेय?

सोनं अन् चांदीच्या किंमती घसरण्याचं सर्वात मोठं कारण अमेरिकन डॉलरची किंमत आहे. ८ दिवसात अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाला. त्याशिवाय अनेकांनी आपल्याकडील सोनं अन् चांदी विक्रीसाठी उपलब्ध केली. २९ जानेवारीच्या सायंकाळापासूनच धातूंच्या किंमतीत घसरण सुरू झाली. सराफा बाजारतील सध्याची घसरणीचं मुख्य कारण अमेरिकन डॉलरची मजबूती आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या नवीन प्रमुखांची नियुक्ती आहे. इतर चलने असलेल्या देशांसाठी डॉलरमध्ये व्यापार होणाऱ्या वस्तू महाग होतात. त्याचा परिणाम सोनं अन् चांदीच्या किंमतीवरच होतो. त्याशिवाय एमसीएक्सने मौल्यवान धातूंच्या करारांवर मार्जिन (ठेवी रक्कम) आणखी वाढवली.

Gold- Silver Price Today
५० वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयंकर अपघात, आधी कंटेनर मग ट्रकने मारली धडक, आरडाओरड अन् किंकाळ्याने परिसर हादरला

सोनं अन् चांदीमध्ये आता गुंतवणूक करावी का?

चांदीच्या किमतीत अचानक झालेल्या घसरणीमुळे वाढत्या अस्थिरतेबद्दल पुन्हा चिंता तयार झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे. पण चांदीची वाढती मागणी अन् वापर यामुळे चांदी भविष्यात मजबूत होऊ शकते. जेपी मॉर्गनच्या गुंतवणूक बँकर्सनी भविष्यात चांदीच्या किमतीत मोठी घसरण होईल, असा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस चांदी अन् सोन्याच्या किंमतीत स्थिरता येऊ शकते. पण पुढच्या वर्षी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. सराफा बाजार तज्ञांनी गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. बाजार स्थिर होईपर्यंत गुंतवणूक करू नये, असा सल्ला पृथ्वी फिनमार्टचे मनोज कुमार जैन यांनी गुंतवणूकदारांना दिलाय.

Gold- Silver Price Today
Gold Rate Today : 'रोझ डे'ला सोन्याचे दर वाढले, प्रति तोळा झालं इतके; वाचा 24, 22 ,18 कॅरेटचे लेटेस्ट गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com