Madhya Pradesh Crime news Saam Tv News
देश विदेश

मेव्हणीच्या प्रेमात भाऊजी सैराट! दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या; जंगलात नेऊन असं काही केलं..| Crime

Two Brothers Killed by Lover in Jungle: सिवनी शहरात दोन लहान मुलांचं अपहरण करून जंगलात त्यांची हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून काकानेच हा खून केला. पोलीस तपासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

मध्यप्रदेशच्या सिवनी शहरात सुभाष वार्ड परिसरात दोन भावांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली. तसेच २४ तासांत हत्येचा उलगडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या काकाने आरोपीसोबत मिळून त्यांचं अपहरण केलं. नंतर जंगलात नेऊन चाकूने त्यांचा गळा चिरला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजराम बेलवंशी असे आरोपीचे नाव आहे. त्याचे पूजा धाकरिया या महिलेवर जीव जडला होता. पूजा आपल्या दोन मुलांसह सिवनी येथे राहत होती. पतीसोबत खटके उडाल्यानंतर तिनं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. भोजरामचे पूजावर एक तर्फी प्रेम होते. तो तिच्या घरी वारंवार जात होता. मात्र, पूजाचे त्याच्या मुलांवर जीवापाड प्रेम होते.

हीच गोष्ट भोजरामला खटकली. त्यानं पूजाच्या मुलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानं घटनेच्या दिवशी मुलांना सायकल देण्याचं आमिष दाखवलं. नंतर मुलांना ऑटोने जनता नगर चौकात नेलं. त्या ठिकाणी शुभम नावाचा व्यक्ती सायकल घेऊन उभा होता. नंतर चौघे जंगलात गेले. दोघांनी मिळून मुलांचा गळा चिरून खून केला.

एसपी सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजराम आणि सुनीलला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरलेला धारदार चाकू आणि मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून, या ह्रदयद्रावक घटनेमुळे सिवानी शहरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rules: लग्नासाठी पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या EPFO चे महत्त्वाचे नियम

Shocking: ...आज मी शांतपणे झोपेन, बलात्कार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर, मृतदेह घेण्यास वडिलांचा नकार

Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकीचे खास फोटोशूट; 28 व्या वाढदिवसाचा ग्लॅमरस लूक व्हायरल

Political News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नवा पत्ता उघडला; प्रसिद्ध गायिकेची पक्षात एन्ट्री, निवडणूक लढवणार

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांचे निधन.

SCROLL FOR NEXT