जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल; रात्रीच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई | Jitendra Awhad

Jitendra Awhad News: महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
Jitendra Awhad
Jitendra AwhadX
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मरीन ड्रायव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसोबत विधानभवन परिसरात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या राड्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या वाहनासमोर बसून आंदोलन केलं. या प्रकरणानंतर आव्हाडांविरोधात कारवाई करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून आव्हाड विरूद्ध पडळकर असा वाद सुरू आहे. काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पडळकरांच्या ५ कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ही दृष्य कॅमेऱ्यात कैद झालीये. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Jitendra Awhad
Baramati: कामाचा ताण असह्य; मॅनेजरची बँकेतच आत्महत्या, चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांच्या कार्यकर्त्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. तसेच पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केलं. आव्हाड यांनी पोलिसांना संतप्त सवाल करत, कार्यकर्त्यांना घेऊन जाणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या हातापायाला खेचत बाजूला केलं.

Jitendra Awhad
Akola: धक्कादायक! महिला अधिकाऱ्याचा वकिलाकडून विनयभंग; अश्लील मेसेज अन् कार्यलयात घुसून त्रास, नेमकं काय घडलं?

दरम्यान, सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नितीन देशमुखला कोर्टात हजर करणार

काल विधान भवन लॉबीमध्ये झालेल्या राड्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com