Madhya Pradesh Assembly Election 2023 Saam Tv
देश विदेश

MP Assembly Election: केंद्रीय मंत्री विधानसभेच्या रिंगणात, मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जारी केली दुसरी यादी

Satish Kengar

MP Assembly Election:

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्र्यांपासून खासदारांची नावे आहेत. दिमानी येथून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर निवडणूक लढवणार आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाने सतना खासदार गणेश सिंह, सिद्धीच्या खासदार रीती पाठक, निवासमधून फग्गन सिंग कुलस्ते, नरसिंगपूरमधून प्रल्हाद सिंग पटेल, गदरवारा खासदार उदय प्रताप सिंग यांना तिकीट दिले आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिग्गजांची फौज उतरवली आहे. होशंगाबादचे खासदार उदय प्रताप सिंह यांनाही संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांशिवाय कैलाश विजयवर्गीय यांनाही तिकीट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या दुसऱ्या यादीत ३९ उमेदवारांची नावे असून त्यापैकी ६ महिला आहेत. याआधी ऑगस्टमध्ये भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यात ३९ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता.

भाजपने १७ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत ७८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने काही पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. तब्बल १५ महिन्यांनंतर हे सरकार पडले आणि भाजप पुन्हा सत्तेत आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT