LUCKNOW MURDER CASE: BOYFRIEND CONFESSES TO KILLING 19-YEAR-OLD BTECH STUDENT, SKELETON FOUND IN FOREST Saam Tv
देश विदेश

Shocking : १९ वर्षीय प्रेयसीला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला; हैवान बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

Uttar Pradesh Crime News : लखनौच्या बीकेटी परिसरात १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थिनीची प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या कबुलीनंतर महिपतपूर जंगलात विद्यार्थिनीचा सांगाडा सापडला.

Alisha Khedekar

  • लखनौच्या बीकेटी परिसरात धक्कादायक घटना

  • 19 वर्षीय बी.टेक विद्यार्थिनीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला

  • तरुणीच्या प्रियकराने केली हत्या

  • पोलिसांचा तपास सुरू

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील बीकेटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या प्रियकरानेच तिचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र, दुपारपर्यंत ती घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, २५ मे रोजी तक्रार देऊनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही.

त्यानंतर २८ मे रोजी मुलीच्या वडिलांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी विद्यार्थिनीच्या प्रियकराची चौकशी केली. सुरुवातीला तो दिशाभूल करणारी माहिती देत होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. आरोपीच्या माहितीच्या आधारे बीकेटी आणि सीतापूर पोलिसांचे पथक महिपतपूरच्या जंगलात पोहोचले. तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. जंगलात सापडलेला मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. अनेक दिवसांपासून मृतदेह जंगलात पडून असल्याने त्याचे सांगाड्यात रूपांतर झाले होते. तसेच वन्य प्राण्यांनी मृतदेहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलीच्या वडिलांनी तिच्या कपड्यांवरून आणि चपलांवरून ओळख पटवली. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, आरोपी प्रियकराची सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT