MP Mohammad Faisal Saam
देश विदेश

MP Mohammad Faisal : लोकसभेत वाढली शरद पवार गटाची ताकद; मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा बहाल

MP Mohammad Faisal: सचिवालयाने ५ वर्षात फैजल यांची खासदारकी दोन वेळा बहाल केलीय.

Bharat Jadhav

MP Mohammad Faisal:

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल पीपी यांच्या अपात्रतेचा निर्णय रद्द करण्यात आलाय. मोहम्मद फैजल हे लक्षदीप येथील शरद पवार गटाचे खासदार आहेत. लोकसभा सचिवालयाने याबाबत आदेश जारी केलाय. सचिवालयाने ५ वर्षात फैसल यांची खासदारकी दोन वेळा बहाल केलीय.(latest News )

फैजल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. हा आदेश पुढील न्यायालयाच्या निर्णयांच्या अधीन असेल,असं लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय. यावर्षी ४ ऑक्टोबर रोजी त्यांना लोकसभेचे सदस्य म्हणून दुसऱ्यांदा अपात्र ठरवण्यात आले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीपचे खासदार फैजल यांना २००९ च्या हत्येचा प्रयत्न प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने फैजल यांना १० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान ११ जानेवारी रोजी फैजल यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी अपात्र करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते २०१४ आणि २०१९ मध्ये लक्षद्वीपमधून खासदार म्हणून निवडून आले होते.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा

पी सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कावरत्ती सत्र न्यायालयानं फैजल आणि इतर तिघांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर फैजल अपात्र ठरवण्यात आले होते. केरळ उच्च न्यायालयाने २९ मार्च रोजी या खटल्यातील त्यांची शिक्षा स्थगित केल्यानंतर फैजल यांच्या अपात्रेचा निर्णय दोन महिन्यांनी रद्द करण्यात आली.

ऑगस्ट २०२३ मध्ये केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपने दाखल केलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयात परत पाठवले होते. शिक्षेला स्थगिती देण्यासाठी खासदाराच्या अर्जावर नव्याने निर्णय घेण्यास सांगितलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT