MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; याचिकेवर पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला

MLA Disqualification Case: दोन्ही गटांना १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे.
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSaam Digital
Published On

MLA Disqualification Case:

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा सुनावणी पार पडली आहे. आज पार पडलेल्या सुनावणीवेळी पुढील सुनावणीसाठी २१ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आलीये. तसेच दोन्ही गटांना १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे.

मागिल सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाने आमदारांना व्हीप बजावल्यासंदर्भात युक्तीवाद केला. यावेळी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीचा दाखला देत ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला आहे.

MLA Disqualification Case
Prakash Solanke News: 'हल्ला करणारे माझे विरोधक; पोलिसांना माहिती होती तरीही...' आमदार प्रकाश सोळंके यांचे गंभीर आरोप

ठाकरे गटाकडून युक्तीवाद करताना आमदारांना मेलमार्फत व्हीप बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं की, आम्हाला अद्यापही कोणताही मेल आलेला नाही. जर आम्हाला व्हीप मिळाला नाही तर नाही म्हणूनच सांगणार, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

विधानसभा अध्यक्ष राऊल नार्वेकरांनी या सुनावणीवेळी म्हटलं की, मला लवकरात लवकर कमी वेळेत या सर्व प्रकरणांवर सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांची शाब्दीक चकमक झाल्यावर या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यायचाय असं, राहुल नार्वेकर म्हणाले.

आजची सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणीसाठी २१ नोव्हेंबरला होणार आहे. दिवळीच्या कालावधीमध्ये देखील सुनावणी पार पडणार आहे. १६ तारखेपर्यंत दोन्ही गटांना आपले कागदपत्र सादर करण्यास राहुल नार्वेकरांनी सांगितले आहे. तसेत ३१ डिसेंबर आधी या प्रकरणी निकाल लावला जाईल, असंही राऊल नार्वेकरांनी म्हटलंय.

MLA Disqualification Case
Kalyan Crime News: ब्रेकअप केल्याने प्रेयसीला घरात घुसून पेटवलं; कल्याणमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com