राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वणवा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर दगडफेक करुन जाळपोळ करण्यात आली. यामध्ये प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यासह, गाड्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत हा हल्ला पुर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले प्रकाश सोळंके?
"३० ॲाक्टोबरला माझ्या निवास्थानी हल्ला झाला, तेव्हा मी घरीच होतो. माजलगावमध्ये बंद पुकारला होता. घटनेदिवशी काही लोक माझ्या बंगल्याकडे आले. मला सूचना आली होती. जमावासोबत चर्चा करुन माझी भूमिका मांडायचे असे मी ठरवले होते, मात्र जमाव जवळ आल्यानंतर दगडफेक सुरू झाली." असे प्रकाश सोळंकी म्हणाले.
"त्या जमावात मराठा समाजासोबतच हातभट्टी वाले, राजकीय विरोधक असे काही इतर लोकही होते. मागील काही वर्षातील माझे शत्रू देखील त्या जमावात होते. २०० ते ३०० जण होते जे पुर्ण तयारीने आले होते.." असे म्हणत हा हल्ला पुर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
पोलिसांची बघ्याची भूमिका..
यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याचा कट कुठे झाला, कोणत्या लॅाजवर बैठक झाली. त्यामध्ये कोण कोण होते? ही सगळी माहिती पोलिसांना दिली होती. हल्ल्यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.." असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केले. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.