मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेत दोन तासांचा ब्लॉक असेल. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे सोमटने फाटा जवळ गॅन्ट्री बसविण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जातायेत. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडालीये. पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत, आशी माहिती देखील समोर आलीये.
ब्लॉकवेळी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एमएसआरडिसी आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.
कशी वळवणार वाहतूक ?
मुंबईहून पुणेकडे जाणारी सर्व वाहने एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तर हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गकडे वळवली जाणार आहे. या रस्त्यावरून पुढे वाहने पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.