Viral Video: धक्कादायक..! घरगुती वादातून महिलेचा सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; व्हिडिओ बघूनच धडकी भरेल!

Viral Video: सोशल मीडीयावर रोज काहीना काही भयंकर घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Viral Video
Viral VideoSaam Digital
Published On

Viral Video

सोशल मीडीयावर रोज काहीना काही भयंकर घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी थरारक अपघांताचे तर कधी स्टंटचे व्हिडिओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारी आणि तितकीच धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेने आपल्या सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये या महिलेचा सासरा बचावला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटिझन्स या व्हिडीओवर कमेंट्स करत संताप व्यक्त करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Viral Food Video : बटाट्याच्या सालीपासून बनवली अनोखी डिश; नेमका हा पदार्थ काय आहे? बघा व्हायरल VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ दिसत आहे की, एक महिला बेडरूममधील बेडवर झोपलेल्या सासऱ्याच्या अंगावर जळता कागद टाकते. पण बेडवर झोपलेले आजोबा पायाने तो कागद उडवून देतात. त्यामुळे सुदैवाने काही होत नाही. पण बेडवर ठेवलेली चादर काहीशी जळालेली दिसतेय. जमिनीवर पडलेला हा कागद जळून खाक होतो. ही महिला ज्यावेळी हे कृत्य करते तेवढ्यात घरातील एक व्यक्ती त्याठिकाणी येतो आणि पप्पांना जाळण्याचा ही प्रयत्न करत असल्याचे म्हणत आहे.

घरगुती वादातून ही महिला हे कृत्य करत असल्याचे व्हिडीओवरून दिसून येत आहे. बेडवर झोपलेले आजोबा या महिलेचा सासरा आहे. या महिलेने हे कृत्य का केले यामागचे नेमकं कारण समजू शकले नाही. @gharkekalesh या ट्वीटर अंकाऊटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ त्याच घरातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे समोर आले नाही. या व्हिडिओतील ही महिला मुद्दाम आपल्या सासऱ्याच्या अंगावर जळता कागद टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओला हजारोंपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजर्सने लिहिलं आहे की, 'या जगात कशा पध्दतीचे लोग राहतात' आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की,'हे जर कोणत्या मालिकाचे शुटिंग नसेल तर या महिलेला अटक करण्यात यावी' व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा तपास करुन या महिलेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटिझन्स करत आहेत

Viral Video
Walk-in-interview Viral Video: बापरे! इंटरव्ह्यूसाठी तरुणांची तोबा गर्दी; व्हिडिओ बघूनच धडकी भरेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com