Love Brain Disorder
Love Brain Disorder Saam Tv
देश विदेश

Love Brain Disorder: प्रियकर फोन उचलत नव्हता म्हणून प्रेयसीने केले तब्बल १०० फोन; 'लव्ह ब्रेन' आजार असल्याचे झाले निदान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेमात लोक वेडे होतात. एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात, असं तु्म्ही ऐकलच असेल. परंतु हे सर्व बोलण्यापुरत मर्यादित असेल असं अनेकांना वाटेल. मात्र चीनमधील एक मुलगी प्रेमासाठी काहीही करायला तयार होती. अशातच तिला 'लव्ह ब्रेन' नावाचा आजार झाला आहे.

चीनमधील एका तरुणीने आपल्या प्रियकराला खूप त्रा दिला की त्या तरुणाने चक्क पोलिसात तक्रार केली आहे. चीनमधील या तरुणीने आपल्या प्रियकराला फोन केला होता. प्रियकराने फोन न उचलल्याने ती घाबरली, पॅनिक झाली. त्यानंतर तिने त्याला एक नव्हे १० नव्हे तर तब्बल १०० हून अधिक वेळा कॉल आणि मेसेज केले. तरीही प्रियकराने रिप्लाय न दिल्याने प्रेयसीने घरातील सामानाची तोडफोड केली. तिने बाल्कनीतून उडी मारण्याची धमकीही देऊ लागले. यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रात केली.

मीडिया रिपोर्टनुसार, या तरुणीचं नाव जियाओयू असं आहे. या तरुणीची मानसिक स्थिती खूपच वाईट होती. त्यामुळे तिना डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिथे तिला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसॉर्डर हा आजार झाला आहे. या आजाराला लव्ह ब्रेन म्हटलं जाते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जियाओयू ही कॉलेजच्या दिवसांपासूनच अशी वागत होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षात ती प्रियकरासाठी अटॅच झाली होती. सारखं काही न काही कारणांनी त्याला फोन, मेसेज करायची. प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करायची. तो दिवसभर काय करतो हे पाहण्यासाठी त्याला शेकडो कॉल किंवा मेसेज करायची. यालाच लव्ह ब्रेन असे म्हणतात.

लव्ह ब्रेन म्हणजे काय?

लव्ह ब्रेन ही एक मेडिकल टर्म आहे. जेव्हा प्रियकर आणि प्रेयसीमध्ये पझेसिव्हनेस धोकादायक स्तरावर जातो, त्यामुळे असुरक्षितता वाटते. यालाच लव्ह ब्रेन म्हणतात. सध्या या तरुणीवर चीनमध्ये उपचार सुरू आहेत. चिंता आणि तणाव यामुळे हा आजार होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT