Ambernath, Badlapur News : प्रियकर, पती अन् ३० लाखांची सुपारी, अंबरनाथ - बदलापूर रोडवरील हत्येची अंगावर काटा आणणारी स्टोरी

Ambernath, Badlapur Crime News : अंबरनाथ - बदलापूर रोडवर झालेल्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. कोणताही धागादोरा नसताना देखील पोलिसांनी दिल्लीमध्ये निजामुद्दीन रेल्वे स्थानकात सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीना अटक केली आहे.
Ambernath, Badlapur News
Ambernath, Badlapur NewsSaam Digital
Published On

Ambernath, Badlapur News

अंबरनाथ - बदलापूर रोडवर झालेल्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. कोणताही धागादोरा नसताना देखील पोलिसांनी दिल्लीमध्ये निजामुद्दीन रेल्वे स्थानकात सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीना अटक केली आहे. विशेष म्हणजे सदर हत्या घडवून आणण्यासाठी एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तीन जणांना तब्बल ३० लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आलं आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रमेश झा हा नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात राहात होता. त्याची पत्नी सुमन झा ही आपल्या मुलांसह दिल्ली येथे राहत होती. २५ फेब्रुवारी रोजी रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ - बदलापूर रोडवरील पेट्रोलपंपानजीक जवळ आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील सुरू करण्यात आला होता. अखेर गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४८ तासांच्या आत या हत्येचा उलघडा करण्यात यश मिळवले आहे.रमेश झा यांची हत्या करून आरोपी दिल्ली येथे पळून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

Ambernath, Badlapur News
Jalana Crime: ट्रॅक्टर चोरायचा, परराज्यात विकायचा, एक चुक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; नेमकं काय घडलं?

त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे, राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, चंद्रकांत पाटील या पथकाने दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईल सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीमध्ये सुमन झा, दीपक कुमार, संजय कुमार आणि संतोष गुप्ता यांचा समावेश आहे.

आरोपी सुमन झा या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती रमेश याच्या हत्येसाठी तब्बल ३० लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे. सदर आरोपी उल्हासनगर गुन्हे शाखेने अंबरनाथ पोलिसांच्या हवाले केले असून आरोपींना कोर्टात हजर केले असता 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा देखील शोध सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

Ambernath, Badlapur News
Crime News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीशी भांडण जिवावर बेतलं; राहत्या घरात तरुणाची निर्घृण हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com