Rahul Gandhi  Saam Tv
देश विदेश

Om Birla: अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर संतापले; रविशंकर यांनी दिलं उत्तर

Motion Against Om Birla: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याला बोलून दिलं जात नसल्याचा आरोप केला. यावर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिलं.

Priya More

Summary -

  • ओम बिर्ला यांच्याविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला

  • चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले

  • भाजपकडून रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले

  • अविश्वास प्रस्तावावर सुमारे ११८ खासदारांनी स्वाक्षरी केल्या आहेत

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये आज चर्चा सुरू आहे. या चर्चादरम्यान सत्ताधारी पक्षाने वारंवार नाव घेतल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतापले. राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी आरोप केला की, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलण्यापासून रोखले जात आहे. हे सभागृह एका पक्षाचे नाही तर संपूर्ण देशाचे आहे.

यावेळी बोलताना भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला? असा सवाल करत विरोधकांवरच निशाणा साधला. त्यांनी सांगितले की,'राहुल गांधींनी दाखवलेली माहिती चुकीची आहे. ओम बिर्ला यांना अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप विरोधी पक्षात असताना कधीही लोकसभा अध्यक्षांना घेरलं नाही. आम्ही वॉक आऊट केलं पण कधीही अध्यक्षांवर कागद फेकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहितात कधीही तडजोड करत नाहीत. विरोधीपक्षनेते हे खूप जबाबदारीचे पद आहे.'

मंगळवारी अविश्वास प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांनी आरोप-प्रत्यारोप केले. विरोधकांनी ओम बिर्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. विरोधकांनी ओम बिर्ला यांच्यावर सरकारचा आवाज असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सरकारने सांगितले की, ओम बिर्ला यांनी कधीच पक्षपातपूर्ण व्यवहार केला नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादादरम्यान संसदेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील हा अविश्वास प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावावर जवळपास ११८ खासदारांनी स्वाक्षरी केली होती. या प्रस्तावावर चर्चेसाठी १० तासांचा कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर खासदार त्यावर मतदान करतील. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षाला सध्या बहुमताची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT