Loksabha Election 2024: लोकसभेसाठी भाजपाचे 'गाव चलो अभियान'; १३०० पदाधिकारी करणार बूथवर मुक्काम

Maharashtra Politics: भाजपकडून ५ फेब्रुवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत 'गाव चलो अभियान' राबविले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत लोकप्रतिनिधीसह पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ते म्हणून 36 तास एका बूथवर राहणार आहेत.
Loksabha Election 2024:
Loksabha Election 2024:Saam tv
Published On

चेतन व्यास, वर्धा |ता. ४ फेब्रुवारी २०२४

Loksabha Election 2024:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ५ फेब्रुवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत लोकप्रतिनिधीसह पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ते म्हणून 36 तास एका बूथवर राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दृष्टीने भाजप आता कामाला लागली आहे. भाजपाकडून पाच फेब्रुवारी पासून अकरा फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात 1300 प्रवाशी कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बूथवर मुक्काम करणार आहेत.

तसेच हे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणार असल्याची माहिती भाजपकडून (BJP) आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. या पत्रकार परिषदेत खासदार रामदास तडस (Ramdas Tadas), जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Loksabha Election 2024:
Aditya Thackeray: 'मुंबईची लूट, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट...' आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपने येत्या 10 फेब्रुवारीपासून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 'गाव चलो' अभियान छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या योजना जनतेत पोहचविल्या जाणार असून मोदींच्या गॅरंटीचा प्रसार केला जाणार असल्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी म्हटले आहे. भाजपाला 51 टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे यांनी म्हटले आहे. या अभियानात वातावरण बदलवून प्रत्येक घरांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Loksabha Election 2024:
Pachora Crime : एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडल्या; पाचोऱ्यातील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com