Loksabha: सरकारचा मोठा निर्णय! अवयवदानानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची रजा

Central Government Employees Get 42 Days Leave After Organ Donation: अवयवदान केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची कॅज्युअल रजा मिळणार आहे. याबाबत बुधवारी लोकसभेत निर्णय घेण्यात आला.
Organ Donation
Organ DonationSaam Tv
Published On

काल लोकसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांन जर अवयवदान केले तर त्यांनी ४२ दिवसांची स्पेशल कॅज्युअल सुट्टी दिली जाणार आहे. याबाबत काल बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. जर कोणत्याही केंद्रिय कर्मचाऱ्याने अवयवदान केले असेल तर त्याला ही सुट्टी मिळणार आहे.

Organ Donation
Government Job: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; पगार ८०,००० रुपये, ऑइल इंडियामध्ये निघाली भरती, अर्ज कसा करावा?

याबाबत मंत्री जितेंद्र सिंग यांनी लेखी स्वरुपात माहिती दिली आहे. अवयवदान केल्यानंतर भारत सरकार केंद्रिय कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त सुट्टी दिली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

२०२३ मध्ये कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार अवयवदात्याचादेखील अवयव काढला जातो. त्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये नोंदणीकृत डॉक्टरच्या शिफासशीनुसार विशेष कॅज्युअल रजेचा कालावधी जास्तीत जास्त ४२ दिवस असेल. रुग्णालयात दाखल केल्यापासून ही रजा घेतली जाईल, असं निवेदनात म्हटले आहे. आवश्यक असल्यास सरकारी नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरांच्या शिफारशीनुसार शस्त्रक्रियेच्या जास्तीत जास्त १ आठवडा आधीपासून रजा मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Organ Donation
PM Narendra Modi: PM मोदी गुढीपाडव्याला महाराष्ट्रात, नागपूर दौरा कसा असणार?

दरम्यान, अवयवदानाची शस्त्रक्रियेसाठी खूप वेळ लागतो. त्यानंतर हॉस्पिटलमध्येही बराच वेळ राहावे लागते. डिस्चार्जनंतरही पेशंटला बरे होण्यासाठी बरेच दिवस लागतात. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ४२ दिवसांची प्रासंगिक रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आदेश यापूर्वीच जारी केले होते. आता बुधवारी लोकसभेत याबाबत लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली.

अवयवदान केल्यानंतरही माणूस पूर्णपणे बरे व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे त्याला आरामाची गरज असते. अशा परिस्थितीत त्यांना सुट्टी देणे खूप गरजेचे आहे.

Organ Donation
Parliament Loksabha: काँग्रेसने 6 दशकात संविधानात 75 वेळा बदल केलेत, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com