Parliament Session 2024: नीट परीक्षा घोटाळ्यावरुन संसदेत घमासान! राहुल गांधी आक्रमक; लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत  स्थगित
Loksabha Parliament Session Live Updates:  Saamtv
देश विदेश

Parliament Session 2024: नीट परीक्षा घोटाळ्यावरुन संसदेत घमासान! राहुल गांधी आक्रमक; लोकसभा कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २८ जून २०२४

देशभरात नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणाने खळबळ उडाली आहे. विद्यार्थी, पालकांसह विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. लोकसभेच्या संसदीय अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट परीक्षा घोटाळ्या संदर्भात उत्तर द्यावं, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली. ज्यानंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधक पुन्हा एकदा आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांडून NEET पेपर लीकवर चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सभापती ओम बिर्ला यांनी वेळ देण्यास नकार देत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या उत्तरावेळी तुम्हाला चर्चेसाठी आणखी वेळ मिळेल, असे सांगितले.

तुम्हा सर्वांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल, असे आधीच कळवले आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना सरकारने प्रतिसाद द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. तुम्ही तपशीलवार चर्चा करा असे ओम बिर्ला म्हणाले. मात्र विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला.

"आम्हाला विरोधी पक्ष आणि सरकारकडून भारतातील विद्यार्थ्यांना एक संयुक्त संदेश द्यायचा आहे की हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून, आम्ही विचार केला की विद्यार्थ्यांचा आदर करण्यासाठी आम्ही आज NEET वर चर्चा करू, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, विरोधकांच्या गोंधळानंतर संसदेचे कामकाज सोमवापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : सूर्याचा आज पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश, कोणकोणत्या राशींचे भाग्य पालटणार? वाचा राशी भविष्य

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

SCROLL FOR NEXT