Amit Shah Question To Rahul Gandhi Amit Shah
देश विदेश

Amit Shah: कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले ५ प्रश्न

Amit Shah Question To Rahul Gandhi : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींवर हल्लाबोल करताना अमित शहा यांनी त्यांना पाच प्रश्न केलेत.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असून आरोप-प्रत्यारोप फैरी झडत आहेत. यादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेचं आव्हान दिलं होतं. आता अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट पाच प्रश्न केलेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शहा यांनी राहुल गांधींना प्रश्न केलेत. यावेळी अमित शहा यांनी राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी घेण्यावरूनही भाष्य केलंय. राहुल गांधी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणाहून मैदानात उतरले तरी आपल्याला काही त्रास नसल्याचं शहा यावेळी म्हणालेत.

वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर तेथील जनतेला सांगितलं पाहिजे होतं की, मी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु तुम्ही तेथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिली. तेथील स्थिती चांगली नसल्याचं तुम्हाला जाणवलं त्यानंतर तुम्ही रायबरेलीची निवड केली. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगल नाहीये. त्यांनी वायनाडमधील मतदारांना सांगितलं पाहिजे होतं की,ते वायनाडसह रायबरेलीतून ते निवडणूक लढवणार आहेत, अशी टीका करताना अमित शहा यांनी केलीय.

अमित शहा यांचे राहुल गांधींना ५ प्रश्न

ते तिहेरी तलाक हटवण्याचे समर्थन करतात का, हो की नाही?

ते मुस्लीम पर्सनल लॉ लागू करणार आहेत का?

ते सर्जिकल स्ट्राइकचं समर्थन करतात का?

तुम्ही राम दर्शन करायला का गेले नाहीत?

काश्मिमधील कलम ३७० हटवण्यासंदर्भात तुमचं समर्थन आहे का?

राहुल गांधींचा उद्देश फक्त खोटं बोलणेच आहे का? हे प्रश्न जनतेपुढे मी केलेत त्यामुळे राहुल गांधींना यावर आपली बाजू मांडावी असं अमित शहा म्हणालेत. यावेळी शहा यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी देशातील जनतेला खोटं सांगत आहेत. खोटी माहिती देणं हा त्यांचा उद्देश आहे.

मोदी सरकारने दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हा संविधानात बदल झाला नाही. आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग आरक्षण मिटवण्याचा केला नाहीये. तर आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी केलाय. कलम ३७० हटवणं, तीन तलाक, आणि सीएए कायदा बनवणं, राम मंदिर बनवणं, चंद्रयानचं लॉन्चिंग आणि १३० कोटी देशवासियांना वाचवण्यासाठी केला. पण राहुल गांधी यासर्व गोष्टींकडे विदेशी चष्मातून बघतात. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही कधीच धर्म आणलं नाही. हे जेव्हा-जेव्हा घडले आहे, तेव्हा ते काँग्रेसने केलंय. आता काँग्रेसला मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT