PM Narendra Modi Lok Sabha 2024  Saam Digital
देश विदेश

Narendra Modi: PM मोदींकडून प्रचारसभांचा धडाका; आज तेलंगणा-कर्नाटकला भेट देणार, हैदराबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार

Lok Sabha Election 2024: तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्यांना आज भेट देऊन पंतप्रधान मोदी वादळी सभा घेणार आहेत. यादरम्यान, ते तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रोड शो देखील करणार आहेत.

Satish Daud

Narendra Modi Lok Sabha 2024 Latest News

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार असून लवकरच आचारसहिंता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय पक्षांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात असताना, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्यांना आज भेट देऊन पंतप्रधान मोदी वादळी सभा घेणार आहेत. यादरम्यान, ते तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रोड शो देखील करणार आहेत. तेलंगणा भाजपच्या म्हणण्यानुसार हा रोड शो सुमारे तासभर चालणार आहे. (Latest Marathi News)

मिर्झागुडा येथून या रोड शोला सुरुवात होणार असून शुक्रवारी संध्याकाळी मलकाजगिरी येथे भाजपकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणाचा दौरा केला होता.

यावेळी त्यांनी भाजप आणि एनडीएच्या मित्रपक्षांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले. मोदींच्या कार्यक्रमांवर नजर टाकली तर, यावेळी त्यांचे लक्ष दक्षिणेतील जागांवर जास्त असल्याचे स्पष्ट होते. दक्षिणेत ते सातत्याने सभा घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे . पंतप्रधानांनी १५ मार्चपासून दक्षिणेचा पाच दिवसांचा दौरा सुरू केला आहे. तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथे रोड शो करत मोदींनी प्रचारसभांना सुरुवात केली. यानंतर त्यांनी केरळ आणि तेलंगणामध्येही निवडणूक कार्यक्रम घेतले.

केरळमध्ये गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएला आपले खातेही उघडता आलेले नाही. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये भाजपकडे सध्या एकही खासदार नाही. मात्र, २०१९ मध्ये तेलंगणामध्ये भाजपने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT