Narendra Modi : एक दशक, परिवर्तन, गॅरंटी...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १४० कोटी नागरिकांना भलंमोठं पत्र

Narendra Modi letter to all citizens : लोकसभा निवडणूक एप्रिलच्या मध्यात सुरु होईल. त्यानंतर मे महिन्यात लोकसभेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उशीरा देशातील नागरिकांना पत्र लिहिलं आहे.
Narendra Modi
Narendra ModiSaam tv
Published On

Narendra Modi Letter :

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची शनिवारी दुपारी ३ वाजता घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच ओडिशा, सिक्कीम , अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक एप्रिलच्या मध्यात सुरु होईल. त्यानंतर मे महिन्यात लोकसभेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उशीरा देशातील नागरिकांना पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना पत्र लिहिताना म्हटलं की, 'आपल्या नात्याला एक दशक पूर्ण होत आहे. तुमचं समर्थन सातत्याने मिळत राहील, याचा मला विश्वास आहे. आम्ही राष्ट्रनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करत राहू. ही मोदींची गॅरंटी आहे', अशा आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना लिहिलंय.

Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : लोकसभेपूर्वीच पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींना मोठा धक्का; TMCच्या २ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात नेमकं काय लिहिलंय?

पंतप्रधान मोदींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं की, 'माझे सर्व कौटुंबीक सदस्यांनो, आपल्या नात्याला एक दशक पूर्ण होत आहे. १४० कोटी भारतीयांनी विश्वास आणि पाठिंबा दिला. यामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं आहे. गेल्या १० वर्षातील हे सर्वात मोठं यश आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत'.

'पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पक्के घर, वीज, पाणी आणि एलपीजी गॅस पोहोचला. आयुष्य भारताच्या माध्यमातून आजारांवर उपचार, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाय्य मिळालं आहे, असं मोदींनी म्हटलं.

'आपला देश परंपरा आणि आधुनिकता हे दोन्ही घेऊन पुढे जात आहे. मागील दहा वर्षात पुढील पीढीसाठी पायाभूत सुविधांचा पाया रचला. आपल्या राष्ट्र आणि सांस्कृतिक वारशातही मोठा बदल झाला. तुमचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे जीएसटी लागू केली, कलम ३७० हटवलं, तिहेरी तलाकवर नवा कायदा आणला, नारी शक्ती वंदन कायदा, संसद भवनाचं उद्घाटन , दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले', असं त्यांनी पुढे सांगितलं.

Narendra Modi
Rahul Gandhi: राष्ट्रवादी-शिवसेना फोडण्यासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या पैशाचा वापर; राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

'लोकशाहीची सुंदरता लोकसहभागामध्ये आहे. तुमचं समर्थन कल्याणकारी निर्णय, महत्वाच्या योजना तयार करणे या बाबी योजनांची अंमलबजावणी करण्यास शक्ती देते. तसेच विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी तुमचे विचार, सल्ला आणि समर्थनाची आवश्यकता आहे. याची वाट पाहतोय. मला विश्वास आहे की, आपण एकत्र येऊन देशाला नवीन उंचीवर नेऊ. तुम्हला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com