PM Narendra Modi  Saam Digital
देश विदेश

Narendra Modi : आता आई-बहिणींच्या मंगळसूत्रावर त्यांची नजर; काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर PM नरेंद्र मोदींची जहरी टीका

Narendra Modi News : 'आता कायद्यात बदल करून आपल्या आई-बहिणींची मालमत्ता हिसकावण्यावर त्यांची नजर आहे. तसेच यांची त्यांच्या मंगळसूत्रावर नजर आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभेच्या प्रचारसभांमधून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगडमधूनही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. 'आता कायद्यात बदल करून आपल्या आई-बहिणींची मालमत्ता हिसकावण्यावर त्यांची नजर आहे. तसेच यांची त्यांच्या मंगळसूत्रावर नजर आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगडमध्ये जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी समाजवादी पक्ष, काँग्रेसची घराणेशाही, भ्रष्टाचारावरून टीका केली.

'काँग्रेस आणि इंडिया आघाडीची नजर आता तुमच्या कमाईवर आहे. तुमच्या मालमत्तेवर आहे. कोणाची कमाई किती आहे? कोणाजवळ किती मालमत्ता आहे? त्यांचं सरकर आल्यावर चौकशी करणार आहे. ते तुमची मालमत्तेचं वाटप करतील. ही बाब त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. कायद्यात बदल करून तुमच्या आई-बहिणींची मालमत्ता देखील हिसकावून घ्यायची आहे. त्यांची नजर आता त्यांच्या मंगळसूत्रावर देखील आहे, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

'इंडिया आघाडीतील नेते नैराश्यात बुडाले आहेत. भविष्य पाहण्यासाठी त्यांच्याकडे आत्मविश्वास शिल्लक नाही. हे लोक घराणेशाही आणि सत्तेच्या लाभाशिवाय काही करत आहे. आजकाल मी म्हणतो की, मागील १० वर्षात जे केलं, ते ट्रेलर आहे. आम्हाला आणखी बरंच काम करायचं आहे. मी या बाबींवर भाष्य करतो, तेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांना काही कळत नाही, असे ते पुढे म्हणाले.

'चांगलं भविष्य, विकसित भारताची चावी तुमच्याजवळ आहे. आता देशाला गरीबीतून मुक्त करायचा आहे. देशाला भ्रष्ट्राचारातून मुक्त करायचा आहे. देशाला घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्त करायचा आहे. यासाठी फिर एक बार मोदी सरकार गरजेचं आहे, असे मोदी पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT