Mallikarjun kharge : मल्लिकार्जुन खरगे घेणार PM मोदींची भेट; काँग्रेसचा जाहीरनामा समजून सांगण्यासाठी मागितली वेळ

Mallikarjun kharge News : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे.
Mallikarjun Kharge and PM Narendra Modi
Mallikarjun Kharge and PM Narendra ModiSaam Tv

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातील घोषणांचा प्रचार सुरु केला आहे. काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला होता. त्यानंतर भाजपने १४ एप्रिलला जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काँग्रेसचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mallikarjun Kharge and PM Narendra Modi
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान, उमेदवारी अर्जांच्या छाणनीनंतर 317 अर्ज ठरले वैध

नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं होतं?

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषित, तरुणांचा विचार केला नाही. तसेच गरिबांचाही विचार केला नाही. काँग्रेस हा केवळ घराणेशाही करणारा आणि भ्रष्टचारात बुडालेला पक्ष आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा विचार आहे. काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही. कॉंग्रेसचा हा जाहीरनामा खोटारडा आहे'.

'काँग्रेसच्या या जाहीरनाम्याच्या प्रत्येक पानावर देशाचे तुकडे करण्याचा विचार दिसतो. मुस्लिम लीगची विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसला मुस्लिम लीगचे विचार देशावर लादायचे आहेत. काँग्रेसकडे ना तत्त्वे उरली आहेत ना धोरणे, हे जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय, असे मोदी म्हणाले होते.

Mallikarjun Kharge and PM Narendra Modi
Rohit Pawar: अरविंद केजरीवालांसारखी कारवाई माझ्यावरही होईल; रोहित पवारांचा गंभीर आरोप

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा पंतप्रधानांना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितल्याचं समजत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींकडे वेळ मागितल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटण्याच्या विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळ देणार का, हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com