शिवाजी काळे
Delhi earthquake news : देशाची राजधानी दिल्लीमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. साधारण ८ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपात कोणताही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ( Latest Marathi News)
राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांने हादरली आहे. आज, शनिवारी साधारण रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिल्लीत लोकांना भूकंपाचे जाणवले आहेत. भूंकापाच्या धक्क्यानंतर काही लोक घराबाहेर पडले होते. दिल्लीत भूकंप झाल्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
राजधानी दिल्लीसह (Delhi) शेजारी राष्ट्र नेपाळ येथे देखील बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपात नेपाळमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरच्या रात्री १.५७ वाजता राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते.
सदर भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू नेपाळचं मणिपूर शहर होतं. या भूकंपाचा प्रभाव भारतात उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड या राज्यात पाहायला मिळाला होता. त्यानंतर आज, शनिवारी पुन्हा एकदा रात्री ८ वाजता भूकंपाची धक्के जाणवले आहेत.
दरम्यान, याआधी देखील लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल असल्याचं सांगितली गेली. अचानक भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.