ATS
ATSSaam tv

Anti-Terrorism Squad: गुजरात निवडणुकीपूर्वी ATS चा धमाका, 100 हून अधिक ठिकाणी छापे, 65 जणांना अटक

गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई

Gujarat ATS Raid: गुजरात (Gujarat) निवडणुकीपूर्वी दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) मोठी कारवाई होताना दिसत आहे. गुजरातमधील १३ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. काल रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमध्ये विविध जिल्ह्यातून 65 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. एटीएसच्या कारवाईत काही संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय मार्गाने होणाऱ्या करचोरी आणि पैशांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने जीएसटी विभागासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत सुरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या  जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत छापे टाकण्यात आले आहेत.

ATS
Nashik : परिचर्या महाविद्यालय काेसळण्याच्या स्थितीत; नर्सिंगच्या शेकडाे विद्यार्थीनींचा जीव टांगणीला

गुजरातमध्ये मतदानपूर्व विक्रमी रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी गुजरातमध्ये ७१ कोटी ८८ लाख रुपयांची विक्रमी रक्कम जप्त केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरक्षा यंत्रणांनी विशेष कारवाई सुरू केली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच गुजरातमध्ये ७१ कोटी ८८ लाख रुपये जप्त करण्यात आले.

गुजरात निवडणुकीचे वेळापत्रक

गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबरला आणि उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे ५ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. या निवडणुकांसोबतच २०२३ मध्ये होणाऱ्या अन्य काही राज्यांच्या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com