Nashik : परिचर्या महाविद्यालय काेसळण्याच्या स्थितीत; नर्सिंगच्या शेकडाे विद्यार्थीनींचा जीव टांगणीला

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या शहरातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा
Nashik News
Nashik NewsSaam Tv

तबरेज शेख

नाशिक - केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्या नाशिक (Nashik) शहरातील जिल्हा रुग्णालयात असलेले परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय केव्हाही काेसळण्याची भिती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागा कडून निधी मिळत नसल्याने दुरुस्ती चे काम होत नाही.अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Nashik Latest News In Marathi)

प्रशासकीय अनास्थेमुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या 154 विद्यार्थीनीमचा जीव टांगणीला लागला असून जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग कागदी घाेडे नाचविण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाला 44 वर्ष पूर्ण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांनी जिल्हा रुग्णालयास पत्रव्यवहार करत स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण करुन हे महाविद्यालय धाेकेदायक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nashik News
Arvind Kejriwal : आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांना बातमी छापण्यासाठी केजरीवालांची कोट्यावधींची उधळण, सुकेश चंद्रशेखर याचा गौप्यस्फोट

तसेंच तत्काळ ही इमारत दुरुस्त करावी, असेही पत्रात म्हटले आहे. तरीही ठाेस कार्यवाही हाेत नसल्याचे समाेर येते आहे.नाशिक जिल्हा रुग्णालयात शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय असून त्याचे उद्घाटन सन 1978 मध्ये झाले आहे तर, शेजारील जिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारतही 40 वर्षांची झाली आहे. दरम्यान, परिचर्या महाविद्यालयातील भिंती व स्लॅप निकामी हाेत असून काही दिवसांपूर्वी मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील सिमेंटचा भाग अंगावर काेसळून एक परिचारिका जखमी झाली हाेती.

अशा गंभीर घटना घडत असताना नाशिकमधील परिचर्या महाविद्यालयासह हाॅस्टेलची इमारत धाेकेदायक स्थितीत आहे. येथेही सिमेंटने पाेपडे धरले असून काही भाग निकामी हाेत चालला आहे. इमारत अतिशय जुनी झाल्याने तिची कालमर्यादा संपली आहे. तरी देखिल या इमारतीत विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत असून दुर्दैवाने केव्हाही काही अप्रिय घटना घडली तर, जबाबदार काेण असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

दुसरीकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांनाच पत्र पाठविण्यात व्यस्त असून त्यातून इमारतीची दुरुस्ती हाेत नाहीये तर, डीपीडीसीतूनही निधी मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय अनास्थेचा कळस पहायला मिळत असून काही घटना घडण्यापूर्वीच जिल्हा नियाेजन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सचेत हाेऊन तत्काळ उपाययाेजना राबविणे गरजेचे असल्याचे बाेलेले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com