नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सुकेशचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. सुकेशने वकील अशोक सिंह यांच्यामार्फत ही माहिती दिली आहे. सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) यांनी पत्रात माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे लिहिले आहे.
मी माझ्या स्वतःच्या पॉलीग्राफी चाचणीला सहमती दिली आहे. अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचीही तयारी असेल तर पॉलीग्राफ चाचणी करावी. यानंतर सुकेश यांनी एका पत्रात अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. त्यांनी केजरीवाल आणि सतेंद्र जैन यांच्यासाठी करोडो रुपयांची घड्याळे खरेदी केल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सुकेश चंद्रशेखर सातत्याने पत्राद्वारे आम आदमी पार्टीवर निशाणा साधत आहेत.
सुकेशने आतापर्यंत एलजीला तीन पत्रे लिहिली आहेत. त्या पत्रांमध्ये त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्रश्न विचारला आहे की, जर मी देशातील सर्वात मोठा गुंड आहे, तर मग माझ्यासारख्या गुंडाला राज्यसभेची जागा देऊन ५० कोटी रुपये का घेतले? तुम्ही मला अधिकाधिक उद्योगपतींना पक्षाशी जोडून ५०० कोटी रुपये उभे करण्यास सांगितले होते, असेही सुकेशने आपल्या पात्रात म्हंटले आहे. त्या बदल्यात मला कर्नाटकात पक्षात मोठ्या पदाची ऑफरही दिली होती.
पैसे देऊन पेड न्यूज छापली
काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांना पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ % कमिशन देण्यात आल्याचे देखील यावेळी सुकेशने म्हंटले आहे. सुकेशने थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सुकेशने यावेळी केजरीवाल यांच्यासह सतेंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणीचे आव्हान दिले आहे.
मी केलेल्या आरोपांचे पुरावे देखील देण्यास तयार आहे. आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकण्यास सांगितले होते, पण नंतर सतेंद्र जैन यांनी संपूर्ण पेमेंट रोख देण्यास सांगितले. त्यांनी माझ्याकडून पैसे व्हाईट केले असलयाचे सुकेशने यावेळी सांगितले . मी माझ्या स्वत:च्या पॉलीग्राफ चाचणीसाठी तयार आहे. जर तुम्ही बरोबर असाल तर केजरीवाल आणि सतेंद्र जैन तुम्हाला पॉलीग्राफ चाचणी करण्यात काही अडचण नसावी असे देखील सुकेश याने आपल्या पत्रात म्हंटले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.