देश विदेश

LoC Tensions Escalate: पंतप्रधान मोदींची लष्कराला खुली सूट; भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलं; जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले

LoC Tensions Escalate: भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने तयारी सुरू केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष्यतेखाली दिल्लीमध्ये चार बैठका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखासोबत बैठक घेतली. भारतीय लष्करानेच वेळ, काळ ठरावा असे निर्देश मोदींनी दिलेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय.

पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला गेला. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आलीय, पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमारेषेजवळील चौक्या रिकाम्या केल्यात. विशेष म्हणजे चौक्यांवरील झेंडेही त्यांनी उतरवले आहेत. इंडिया टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवरील चौक्यांतून जवानांना हटवण्यात आलंय.

दरम्यान, पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होतंय. याला भारतीय लष्कराकडूनही उत्तर दिले जातंय. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून जाणूनबुजून वारंवार गोळीबार केला जातोय. त्याला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर दिले जातंय. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामुल्ला आणि कुपवाडा भागातील अनेक ठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आलाय.

याच दरम्यान पाकिस्तानने सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या काही चौक्या रिकामा केल्या आहेत. या चौक्यावर तैनात असलेले जवान निघून गेले असून, त्या चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आलेत. ज्याचा अर्थ माघार घेतल्याचे संकेत असल्याचे मानले जातंय. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये चार महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT