Fazhar Ali Comilla physical assault case update Saam tv news
देश विदेश

BNP Leader: ३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही; महिलेला आधी विवस्त्र केलं, नंतर बलात्कार, नेत्याचं महिलेसोबत भयंकर कृत्य

Loan Turns Tragic: ३५ हजार रूपये कर्ज फेडू न शकल्यामुळे कोमिला जिल्ह्यातील महिलेवर बलात्कार करण्यात आला. आरोपी बीएनपी नेता असून, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप उसळला आहे.

Bhagyashree Kamble

फक्त ३५ हजार रूपयांचे कर्ज फेडता न आल्यामुळे पीडित महिलेसोबत एका स्थानिक नेत्याने लैंगिक अत्याचार केला आहे. आधी विवस्त्र केलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. ही संतापजनक घटना बांगलादेशातील कोमिला जिल्ह्यातून उघडकीस येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, संतप्त स्थानिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

फजहर अली असे आरोपीचे नाव आहे. आरोपी बीएनपी म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित असून, स्थानिक नेता असल्याची माहिती आहे. पीडित महिलेने संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. पैसे फेडण्याची तारीख निघून गेली होती. मात्र, पीडित महिलेकडे पैसे नसल्यामुळे ती वेळेत कर्जाची रक्कम फेडू शकली नाही.

पैसे न मिळाल्याने संतप्त झालेला फजहर रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडितेच्या घराबाहेर गेला. त्यावेळेस तिच्या घरातील सदस्य बाहेर गेले होते. आरोपीने दरवाजा ठोठावला. पीडितेने दरवाजा उघडण्यास नकार दिला. आरोपी संतापला. त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्याने आधी महिलेचे कपडे फाडले. त्यानंतर महिलेवर अत्याचार केला. तिने बचावासाठी आरडाओरड केली. आवाज एकून परिसरातील लोकांनी घरात धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचताच त्यांना महिला आणि आरोपी आक्षेपार्ह स्थितीत दिसले. यादरम्यान, कुणीतरी मोबाईल काढून व्हिडिओ शूट केला. तसेच व्हायरल केला. यानंतर काहींनी मिळून फजल अलीला बेदम मारहाण केली. पण लोकांच्या तावडीतून तो कसातरी निसटला आणि फरार झाला.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, 'फजहर अली ड्रग्ज आणि जुगाराचा व्यवसाय करीत होता. तो स्वत:ला खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीचा सदस्य म्हणवू घेतोय, पण त्याच्याकडे अधिकृत कोणतेही पद नव्हते'. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून, या घटनेशी संबंधित ४ तरूणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT