
गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला होता. आक्रमक भूमिका घेत त्रिभाषा सुत्राचा विरोध केला तसेच मोर्चाची घोषणाही केली. मात्र, मोर्चापूर्वीच फडणवीस सरकारनं हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द केले. आता ठाकरे बंधूंनी 'विजयी मेळाव्याचे' आयोजन केले आहे. दरम्यान, राज ठाकरे पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतंच 'ये रे ये रे पैसा ३' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरे कुणालातरी 'माझ्याकडे काय डोळे वटारून बघतोस' असं म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पण ते नेमकं कुणाला बोलले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'ये रे ये रे पैसा ३' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी ट्रेलरचं कौतुक करत त्यांनी संपूर्ण टीमला शुक्षेच्छा दिल्या. 'ये रे ये रे पैसा. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट देखील तुफान गाजेल, याची खात्री', असं म्हणत ठाकरेंनी दिग्दर्शक संजय जाधव, निर्माता अमेय खोपकर यांना शुभेच्छा देत विशेष अभिनंदन केलं.
यावेळी त्यांनी 'मी तर कालच माझा ट्रेलर कालच दाखवला. पिक्चर अभी बाकी है', असं मिश्किलपणे म्हटले आहे. सध्या ट्रेलर लाँचदरम्यानचा राज ठाकरेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेलरबाबात बोलत असताना राज ठाकरेंनी कुणालातरी 'माझ्याकडे काय डोळे वटारून बघतो आहेस' असं म्हटलं आहे. त्यानंतर उपस्थित लोक हसतात. मात्र, ते नेमकं कुणाला बोलत आहेत? यामागचं कारण काय? हे अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ये रे ये रे पैसा ३' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आघाडीच्या कलाकारांनी काम केलंय. सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित यांनी उत्तम कामगिरी केली असून, विनोद, ड्रामा, आणि उत्तम अभिनयाचा संगम असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.