LK Advani Saam Tv
देश विदेश

LK Advani 96th Birthday: लालकृष्ण अडवाणी यांची पंतप्रधान होण्याची संधी कशी गेली?

Bharat Jadhav

Happy Birthday LK Advani:

आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा ९६ वा वाढदिवस. कोणे एके काळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असेलेले आडवाणी आज विजनवासात गेलेत. आडवाणी जरी आज पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात असले, तरी २०१९ पासून ते राजकारणात सक्रिय नाहीत. २००२ साली त्यांना पंतप्रधान पदाची आलेली संधी हुकली. पण ही संधी काय होती, काय आहे तो किस्सा जाणून घेऊया.(Latest News)

वर्ष २००२. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होतं. २००२ साली राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली होती. भाजपच्या एनडीए आणि विरोधात असलेली काँग्रेस आपापल्या उमेदवाराची चाचपणी करत होते. बहुमत भाजपच्याच बाजुने होतं, म्हणून भाजपचाच उमेदवार विजयी होईल हे निश्चित होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या काही नेत्यांनी राष्ट्रपतीपदासाठी वाजपेयी यांचंच नाव पुढे केलं. वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी आणि राष्ट्रपती व्हावं असं भाजपच्या नेत्यांनी सुचवलं. वाजपेयीनंतर लालकृष्ण आडवाणी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी अशी योजना होती.

अशोक टंडन हे पंतप्रधान वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार होते. त्यांनी लिहिलेल्या द रिव्हर्स स्विंग या पुस्तकात हा किस्सा सांगितलाय. अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपती व्हावं असं भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना सुचवलं होतं. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखातील या घटनेला दुजोरा दिला होता. पण वाजपेयी यांनी राष्ट्रपती होण्यास नकार दिला होता.

वाजपेयी म्हणाले होते की एका पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने राष्ट्रपती बननं हे संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत वाजपेयी यांनी राष्ट्रपती होण्यास नकार दिला.

राष्ट्रपतीपदासाठी कुठला उमेदवार असावा, यासाठी काँग्रेस नेत्यांनी वाजपेयी यांची भेट घेतली. त्यात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह होते. वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदासाठी एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव सुचवलं. कलाम यांचं नाव सुचवल्यावर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह दोघेही आश्चर्यचकित झाले. या नावाला विरोध होऊच शकत नाही असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, आणि तेच राष्ट्रपती झाले.

पुढे २००४ साली भाजपचा पराभव झाला. वयोमानामुळे वाजपेयी राजकारणातून दूर झाले. त्याच वर्षी आडवाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण २००५ ,साली मोहम्मद अली जीना यांची प्रशंसा केल्याने त्यांना पायउतार व्हावं लागलं. पुढे २००९ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीरही केलं.

पण तेव्हा पुन्हा काँग्रेसचा विजय झाला आणि मनमोहन सिंह पुन्हा पंतप्रधान झाले. २०१४ च्या निवडणुकीपुर्वी नरेंद्र मोदी यांना पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलं. २०१९ साली पक्षाने त्यांना तिकिटही दिलं नाही. नंतर नंतर आडवाणी यांच्या पंतप्रधान होण्याची शक्यता मावळलीच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT