PM Modi, Nitish Kumar
PM Modi, Nitish KumarSaam Digital

PM Modi, Nitish Kumar: यांना लाज नाही...; महिलांबद्दल नितीशकुमारांनी केलेल्या वक्तव्यावर PM मोदी संतापले

PM Modi, Nitish Kumar: मुख्यमंत्री सारख्या महत्त्वाच्या पदावर असतानाही बिहारच्या विधानसभेत महिलांवर आक्षेपार्ह विधान केले. मात्र, भाजपविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात चक्कार शब्दही काढला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी केली आहे.
Published on

PM Modi, Nitish Kumar

मुख्यमंत्री सारख्या महत्त्वाच्या पदावर असतानाही नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत महिलांवर आक्षेपार्ह विधान केले. मात्र, भाजपविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात चक्कार शब्दही काढला नाही. यावरून त्यांचा दुटप्पीपणा आणि महिलांविषयी असलेल्या भावना स्पष्ट दिसता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेश येथील रॅलीत त्यांनी नितीश कुमार यांचे थेट नाव न घेता निशाणा साधला आहे.

इंडिया आघाडीतील एका मोठ्या नेत्याकडून भर सभागृहात महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरली जाते हे कल्पनेपलीकडचे आहे. त्याबाबत त्यांना खेदही वाटत नाही. जे लोक महिलांबाबत असा विचार करत असतील त्यांच्याकडून महिलांनी कोणती अपेक्षा ठेवावी. असे लोक कधी महिलांचा आदर करतील का, अशा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत, महिला सुशिक्षित झाल्या तर लोकसंख्याही नियंत्रणात राहते. बिहारमध्ये अलिकडे महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामळे प्रजनन दरही २ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे विधान केले होते. त्यानंतर भाजपच्या महिला आमदार आणि महिला आयोगाने नाराजी व्यक्त करत माफी मागण्याची मागणी केली होती.

PM Modi, Nitish Kumar
PM Narendra Modi: ओबीसींना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं; नरेंद्र मोदींना ठाम विश्वास

त्यानंतर नितीश कुमार यांनी, मी पत्रकारांसमोर याबाबत खंत व्यक्त केली आहे. माझ्या बोलण्याने कोणी दुखावले गेले असतील तर मी माझ्या विधानाचा निषेध करतो. मी नेहमीच महिला सबलिकरणासाठी महिलांचे साक्षरेतेचे प्रमाण वाढण्याबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर बोलत आलो आहे. त्याचा पुरस्कार केला आहे. मी सभागृगात जे काही बोललो आहे, ते संदर्भाला धरून आहे. महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण आणि प्रजननाचा दर याचा थेट संबंध कसा आहे, याची माहिती सभागृहाला देत होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

PM Modi, Nitish Kumar
Bihar CM Nitish Kumar: महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर वाद चिघळला... नितीश कुमार यांनी मागितली माफी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com