PM Narendra Modi: ओबीसींना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं; नरेंद्र मोदींना ठाम विश्वास

PM Modi on OBC community: ओबीसी समाजाला न्याय फक्त भाजपचं देऊ शकतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
PM Narendra Modi said only BJP can give justice to OBC community In Telangana Sabha
PM Narendra Modi said only BJP can give justice to OBC community In Telangana SabhaSaam TV
Published On

PM Modi on OBC community

ओबीसी समाजाला न्याय फक्त भाजपचं देऊ शकतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हैदराबाद येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. एनडीए आणि भाजप हे ओबीसींच्या हिताची सर्वाधिक काळजी घेतात. त्यांना सर्वाधिक प्रतिनिधित्व देतात. आज केंद्रातील एनडीए सरकारमध्ये २७ ओबीसी मंत्री आहेत, जे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi said only BJP can give justice to OBC community In Telangana Sabha
Maratha Reservation: मराठा समाजाचं वाटोळं मराठा नेत्यांनीच केलं, २४ डिसेंबरनंतर नावं जाहीर करणार; मनोज जरांगेंचा इशारा

तेलंगणा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपने देखील तेलंगणात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे जाहीर सभा घेतली.

एलबी स्टेडियमवर झालेली मोदींची सभा ऐकण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, या मैदानाच्या आशीर्वादाने मी पंतप्रधान झालो. आता याच मैदानाच्या आशीर्वादाने तेलंगणातून भाजपचा पहिला मागास मुख्यमंत्री होणार आहे. दरम्यान, आपल्या भाषणातून मोदींनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला.

तेलंगणात सध्या बीआरएस पक्षाची सत्ता असून के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर देखील मोदींनी टीका केली. बीआरएसने तेलंगणातील जनतेची मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. बीआरएसने राज्यातील जनतेला पाणी, पैसा, रोजगाराचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असं मोदीं यांनी म्हटलं.

तेलंगणात सत्ता आली तर भाजपचा पहिला मुख्यमंत्री मागास प्रवर्गातील असेल, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भाजपने नेहमीच ओबीसींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आहे. ओबीसी समाजाला न्याय फक्त भाजपचं देऊ शकतं. आज शात भाजपचे ८५ ओबीसी खासदार आहेत. यातील २७ खासदार केंद्रात मंत्री आहे. त्याचबरोबर भाजपचे ३६५ ओबीसी सदस्य असल्याचा दाखल मोदींनी हैदराबाद येथील जनतेला दिला.

PM Narendra Modi said only BJP can give justice to OBC community In Telangana Sabha
Maharashtra Rain Alert: राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात; पुढील २४ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com