Leander Paes joins BJP in presence of senior leaders ahead of West Bengal elections. Saam tv
देश विदेश

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

West Bengal Politics: टेनिसचे दिग्गज लिएंडर पेस भाजपमध्ये सामील झाले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जातोय.

Bharat Jadhav

  • लिएंडर पेस भाजपमध्ये सामील

  • बंगाल निवडणुकीआधी मोठी घडामोड

  • ममता बॅनर्जी यांना राजकीय धक्का

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा बसला आहे. टीएमसीला रामराम ठोकत टेनिसमधील दिग्गज खेळाडू लिएंडर पेस हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेला भाजप प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जातोय. बंगाल विधानसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी शक्यात वर्तवली जातेय.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पेस यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. लिएंटर पेस यांनी नुकतीच कोलकाता येथे भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. लिएंडर पेस राजकारणात पहिल्यांदाच उतरत नाहीत. ते २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान ते खूप सक्रिय होते.

मात्र त्यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. आता भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जातेय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लिएंडर पेस म्हणाले, "माझा जन्म बंगालमध्ये झाला आणि माझी आई बंगाली आहे. तिच्या काळात खेळांसाठी कोणतीही सोय नव्हती. बंगालमधील मुलांना आणि तरुणांना सक्षम करण्याची गरज आहे."

त्याने ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लिएंडर पेसने ऑलिम्पिक पदकासह अनेक ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप बंगाल निवडणुकीत लिएंडर पेसला स्टार प्रचारक म्हणून उतरवेल असा अंदाज आहे. लिएंडर पेसला दुहेरीतील एक महान खेळाडू मानले जाते. महेश भूपती आणि मार्टिना नवरातिलोवा यांच्यासोबतच्या त्याच्या भागीदारीची खूप प्रशंसा झाली होती. त्यांनी १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT